25 April 2024 11:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी?
x

मोदी सरकारकडून केवळ तारखा | टिकरी बॉर्डरवर शेतकऱ्याची आत्महत्या

Agitating farmers, Haryana, Delhi Tikri border, committed suicide

नवी दिल्ली, ०७ फेब्रुवारी: केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात हरयाणा-दिल्लीच्या टिकरी बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्यांपैकी एका आंदोलक शेतकऱ्याने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. आत्महत्येपूर्वी या शेतकऱ्यानं सुसाईड नोट लिहिली असून यामध्ये केंद्र सरकारवर आरोप केले आहेत.

आत्महत्या केलेला शेतकरी जींदच्या सिंहवाला येथील रहिवाशी असल्याचं सांगितलं जात आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव दरियाव सिंह असून तो ५० वर्षांचा होता. टिकरी येथील एका बस स्टँडजवळील झाडाला प्लास्टिकच्या रशीनं गळफास घेत दरियाव यांनी आत्महत्या केली आहे. आज सकाळी शेतकऱ्यांना दरियाव यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला आणि एक सुसाईड नोट देखील आढळून आली.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यानं सुसाईड नोटमध्ये मोदी सरकारला जबाबदार धरलं आहे. “भारतीय किसान युनियन झिंदाबाद. मोदी सरकार केवळ तारखांवर तारीख देत आहे. हे काळे कायदे केव्हा रद्द होतील याची काहीच शाश्वती नाही”, असं लिहून शेतकऱ्यानं आत्महत्या केलीय.

दरम्यान, देशातील शेतकरी दिल्लीच्या वेशीवर कृषी कायद्यांच्या निषेधार्थ आंदोलन करीत आहेत. या ठिकाणी केलेली इंटरनेट बंदी कायद्याच्या कचाट्यात अडकणार आहे. इंटरनेटवरील निर्बंध हटवण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. वकिल संप्रीत सिंह अजमानी आणि पुष्पिंदर सिंह यांनी ही याचिका दाखल केली आहे.

 

News English Summary: One of the agitating farmers on the Haryana-Delhi Tikri border has committed suicide by hanging. Before committing suicide, the farmer had written a suicide note in which he accused the central government. The farmer who committed suicide is said to be a resident of Singhwala in Jind. The farmer who committed suicide was 50-year-old Dariyav Singh. Dariyav has committed suicide by hanging himself from a tree near a bus stand in Tikri with a plastic rope.

News English Title: Agitating farmers on the Haryana Delhi Tikri border has committed suicide news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x