26 April 2024 1:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर
x

शिवसेनेच्या मते हा भाजपच्या अहंकाराचा पराभव; पण मित्रपक्ष काँग्रेसच्या अवस्थेवर मौन

Delhi Assembly Election 2020, BJP, Shivsena

नवी दिल्ली: दिल्ली भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात लावलेल्या पोस्टरवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो दिसत आहे. यासोबतच पोस्टरवर, विजयामुळे आम्हाला गर्विष्ठ होत नाही आणि पराभवामुळे आम्ही निराश होत नाही असा संदेश लिहिण्यात आलेला आहे. मतमोजणीआधी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून, दिल्लीमध्ये सरकार बनेल असा विश्वास व्यक्त केला जात होता. मनोज तिवारी यांनी भारतीय जनता पक्षाला ५५ जागा मिळतील असं म्हटलं होतं. पण मतमोजणीला सुरूवात होताच आपने स्पष्ट आघाडी घेतल्याचं समोर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून हे पोस्टर लावण्यात आलं आहे. यामुळे एकप्रकारे भारतीय जनता पक्षाने पराभव स्वीकारण्याची तयारी केल्याचं म्हटलं जात आहे.

भाजपाचा दिल्लीमध्ये पराभव होणार असल्याची चिन्हे दिसताच शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी, भाजपाच्या अहंकाराचा दिल्लीमध्ये पराभव झाला अशी बोचरी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, महाराष्ट्रात शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेचा दिल्लीत परिणाम दिसतोय असंही ते म्हणाले.

“दिल्लीतील जनतेने विकासालाच मत दिलं. दिल्लीकरांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आणि पर्यायाने भाजपाला नाकारले. हा पराभव म्हणजे भाजपाच्या अहंकाराचा पराभव आहे. भाजपाच्या हातातून आता अनेक प्रदेश निसटले आहेत, वसेनेमुळे देशातील राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे,” अशी प्रतिक्रिया परब यांनी प्रसार माध्यमांना बोलताना दिली.

दरम्यान, भारतीय जनता पार्टी पिछाडीवर असली तरी २०१५ मधील निवडणुकीच्या तुलनेत या पक्षाने मोठी एकूण मतांमध्ये झेप घेतली आहे. यामध्ये केवळ जागांमध्ये झालेली वाढच नव्हे तर त्यांच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांच्या टक्केवारीत देखील वाढ झाली आहे. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ३२ टक्के मतं मिळाली होती. यामध्ये काँग्रेसने सुमारे १० टक्के मतं मिळवली होती तर आम आदमी पार्टीला (आप) सर्वाधिक ५४ टक्के मतं मिळाली होती. या तुलनेत यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील ताज्या कलांनुसार, भारतीय जनता पक्षाला ४३ टक्क्यांपेक्षा अधिक मतं मिळाली आहेत. पहिल्या तीन तासांमध्ये समोर आलेल्या आकडेवारीनुसार हा अंदाज बांधण्यात आला आहे. या वाढत्या मतांच्या वाढीच्या जोरावरच भारतीय जनता पक्ष सुमारे २० जागांवार आघाडीवर आहे. २०१५ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला केवळ ३ जागांवरच समाधान मानावे लागले होते.

दरम्यान, या पोस्टरमुळे भारतीय जनता पक्षाने पराभव मान्य केल्याची चर्चा असतानाच दिल्ली भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी मात्र भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत बहुमत मिळेल, असा दावा केला आहे. ‘मी निराश नाही. भारतीय जनता पक्षासाठी आजचा दिवस चांगला ठरेल, असा मला आत्मविश्वास आहे. आम्ही सत्तेत येणार आहोत. भारतीय जनता पक्षाला ५५ जागा मिळाल्यास आश्चर्य वाटून देऊ नका,’ अशी प्रतिक्रिया मतमोजणी सुरू होण्याआधी मनोज तिवारी यांनी दिली आहे.

दिल्ली निवडणूक निकालांमध्ये आपचा विजय झाला तर दिल्लीमध्ये त्यांचं सलग तिसऱ्यांदा सरकार बनणार आहे. दिल्लीकरांसाठी 5 वर्षे कामं केल्यामुळे आपचा विजय निश्चित असल्याचं मनीष सिसोदिया यांनी म्हटलं आहे. ‘दिल्लीत विजय होणार याबाबत आम्हाला आत्मविश्वास आहे. कारण गेल्या ५ वर्षात आम्ही इथल्या लोकांसाठी काम केली आहेत’ असं त्यांनी म्हटलं आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, तसेच गोपाल राय व आतिशी (सर्व आप), भारतीय जनता पक्षाचे आशीष सूद, तेजिंदरपाल बग्गा, विजेंदर गुप्ता आणि अरविंदरसिंह लवली, कृष्णा तीरथ, अलका लांबा हे महत्त्वाचे नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

 

Web Title: Delhi Assembly Election 2020 BJP lost because of their Ego and arrogance says shivsena but quite over congress situation.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x