27 April 2024 6:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

केजरीवाल यांनी घोषणा केल्या कामं नाही; मोदीजी कमी बोलले पण कामं जास्त: चंद्रकांत पाटील

BJP Leader Chandrakant Patil, Delhi Assembly Election 2020, Delhi CM Arvind Kejariwal

नवी दिल्ली: महाराष्ट्रातून दिल्ली विधानसभेच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विनोद तावडे आदी नेत्यांना बोलावण्यात आले आहे. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी देखील दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी एक सभेत उपस्थित लोकांना संबोधित करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘केजरीवाल यांनी केवळ घोषणा केल्या पण कामं आजोबाच्या नाही, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी कमी बोलले पण कामं जास्त केल्याचा दावा केला आहे.

तत्पूर्वी, दिल्लीच्या नरेला विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांनी भाजप उमेदवार नीलदमन खत्री यांच्यासाठी प्रचार रॅली काढली होती. यावेळी हिंदीतून भाषण करतांना पंकजा मुंडे यांनी ” ये झाडू वाली सरकार इस बार दिल्लीसे साफ कर दो’, दिल्ली इस देश का ताज है, उसे मोदीजी के सरपर रखवा दो’ असे आवाहन पंकजा मुंडे करतांना दिसल्या होत्या.

मतदारांना आपली ओळख करून देतांना पंकजा म्हणाल्या, भारतीय जनता पक्षाची मी सामान्य कार्यकर्ती आहे, जेव्हा भारतीय जनता पक्षाचा जन्म झाला, तेव्हाच माझा जन्म झाला, म्हणून माझे नाव देखील पंकजा ठेवण्यात आले होते. गोपीनाथ मुंडे यांच्या पावलावर पाऊल टाकतच मी राजकारणात काम करते आहे. महाराष्ट्रात विरोधकाला पराभूत करून गाडण्याचा आणि आपल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा मला खूप अनुभव आहे, आमची त्यात पीएचडी झाली आहे. म्हणूनच कदाचित मला दिल्लीत बोलावण्यात आले आहे.

दरम्यान, केजरीवाल यांनी विकासाच्या मुद्यांवर भारतीय जनता पक्षाला घाम फोडल्याचे पाहायला मिळत आहे. झारखंड मधील पराभवानंतर भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची करून तगडी फौज केजरीवालांविरोधात उभी करणार असल्याचं चित्र आहे. त्यासाठी देशभरातील तब्बल २००, खासदार, ७० केंद्रीय मंत्री आणि ११ विद्यमान आणि माजी मुख्यमंत्री दिल्लीमध्ये प्रचारासाठी दाखल झाले आहेत. यावर हे सर्वजण आप’ पक्षाला हरवण्यासाठी मुक्काम ठोकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. समाज माध्यमांसह विविध ठिकाणी आप’द्वारे भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे.

 

Web Title:  BJP Leader Chandrakant Patil at Delhi for assembly election 2020 campaign.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x