13 May 2024 11:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉक चार्ट पॅटर्नने चिंता वाढवली, शेअर किती घसरणार? तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या Bonus Shares | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस! स्टॉक प्राईस सुद्धा स्वस्त, खरेदीला ऑनलाईन गर्दी Kuber Yog 2024 | कुबेर योग 'या' 4 राशींच्या लोकांसांठी भाग्यशाली, यामध्ये तुमची नशीबवान राशी आहे का? Numerology Horoscope | 13 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल SBI Mutual Fund | कुटुंबातील लहान मुलांचं आयुष्य बदलेल ही SBI फंडाची खास योजना, अल्पावधीत 30 लाख रुपये मिळतील Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 13 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR भरण्यासाठी फॉर्म-16 का आवश्यक आहे? नसल्यास काय करायचं जाणून घ्या
x

२४ तासांत कोरोनाचे देशात ४७ मृत्यू, १९७५ नवीन रुग्ण

Covid 19, Corona Crisis

नवी दिल्ली, २६ एप्रिल: देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत देशात १९७५ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या २६ हजार ९१७ इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत ५ हजार ९१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ८२६ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती, केंद्रीय आरोग्य मंत्रायाकडून देण्यात आली आहे.

आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार कोरोना विषाणू देशातील ३३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पसरला आहे. महाराष्ट्रात याचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत ३२३ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरातमध्ये ३१७१ रुग्ण आढळले आहेत. तर १३३ लोकांचा मृत्यू झाला आहे.दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर असून २६२५ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ५४ लोक दगावले आहेत. त्याखालोखाल, मध्यप्रदेश २०३६ कोरोनाबाधित, ९९ मृत्यू तमिळनाडू १८२१ संसर्गग्रस्त, २३ मृत्यू आणि उत्तरप्रदेश १७९३ कोरोनाग्रस्त असून २७ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

News English Summary: The number of corona victims in the country is increasing rapidly. In the last 24 hours, 1975 new corona patients have been found in the country. So far 47 people have died. As a result, the total number of corona victims in the country has now reached 26,917. So far 5,914 patients in the country have been corona free. As many as 826 people have died due to corona, according to the Union Health Ministry.

News English Title: Story Country Covid 19 Update 47 Corona virus Death 1975 New Case in 24 Hours in India Total Patient 26917.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x