13 December 2024 8:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

बहुमत चाचणी उद्याच घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश | तत्पूर्वी मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार

Maharashtra Political Crisis

Maharashtra Political Crisis | सर्वोच्च न्यायालयाने आज सर्वात मोठा निकाल दिला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेल्या बहुमत चाचणीच्या आदेशाविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुमारे चार तास चर्चा झाली. अखेर चार तासांच्या तीव्र चर्चेनंतर सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. उद्या बहुमताने सुनावणी होईल, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

राज्यपालांचा निर्णय कायम ठेवला :
घटनात्मक पेच निर्माण झाल्यास सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. ही ऐतिहासिक सुनावणी मानली जात होती. अखेर बहुमताचा खटला तहकूब करता येणार नाही, असा निर्णय देत सुप्रीम कोर्टाने राज्यपालांचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे महाविकास आघाडीला हा सर्वात मोठा धक्का आहे.

गुरुवारी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश :
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला गुरुवारी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. 16 आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न हा न्यायालयात प्रलंबित असताना राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले, हे वैध नसल्याचं सांगत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

शिवसेनेच्या वतीने काय युक्तीवाद झाला :
अपात्रतेचा निर्णय घेतल्यानंतरच बहुमत चाचणी करायला हवी, कारण त्यानंतर सभागृहातील सदस्यांची संख्या बदलणार. जर बंडखोर आमदारांना निलंबित केलं तर सभागृहातील संख्या कमी होईल. 11 तारखेला जर हे आमदार अपात्र ठरले तर त्यांची अपात्रता ही 21 जूनपास असेल. याचा अर्थ हा या आमदारांचे मत अवैध ठरेल असं उत्तर अभिषेक मनू सिंघवी यांनी दिलं. त्यामुळे या आमदारांना जर बहुमत चाचणीमध्ये सहभागी करुन घेतलं तर ती बहुमताची खरी परीक्षा होणार नाही असंही सिंघवी यांनी म्हटलं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maharashtra Political Crisis over floor test check details 29 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x