13 October 2024 3:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest | 5 वर्षांसाठी केलेली FD 1 वर्षातच तोडायची असल्यास व्याज मिळेल की उलट पैसे कापले जातील No Cost EMI | नो कॉस्ट EMI खरंच फायद्याचा असतो, खरंच फ्री सुविधा मिळते का, असा असतो खेळ - Marathi News Nippon India Small Cap Fund | बापरे, महिना रु.10,000 SIP करा, ही योजना 1 कोटी 53 लाख रुपये परतावा देईल - Marathi News TCS Share Price | टाटा ग्रुपचा IT शेअर देणार मोठा परतावा, TCS स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TCS Manmauji Movie Release Date | एका तरुणासाठी स्त्रियांना झालंय प्रेमाचं लागीर, 'मनमौजी' सिनेमाची रिलीज डेट जाहीर IREDA Share Price | PSU IREDA शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | डिफेंस क्षेत्रातील शेअर रॉकेट तेजीत परतावा देणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO
x

धक्कादायक! एक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्येत ठाणे जिल्ह्याने मुंबईला मागे टाकलं

Thane, TMC, Covid 19, Corona Virus

ठाणे, 4 जुलै : महाराष्ट्रात ६ हजार २३४ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासात १९८ मृत्यू करोनामुळे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांच्या या संख्येमुळे महाराष्ट्रातील करोना एकूण करोना रुग्णांची संख्या १ लाख ९२ हजार ९९० इतकी झाली आहे. ज्यापैकी १ लाख ४ हजार ६८७ रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत महाराष्ट्रात ८ हजार ३७६ रुग्णांचा मृत्यू करोनाची बाधा झाल्यामुळे झाला आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ७९ हजार ९११ अॅक्टिव्ह केसेस आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

मात्र धक्कादायक गोष्ट म्हणजे शुक्रवारी समोर आलेल्या आकडेवारीनंतर एक्टिव्ह रुग्णसंख्येत ठाणे जिल्ह्याने मुंबईला मागे टाकल्याचे स्पष्ट झाले. सध्याच्या घडीला मुंबईत २४९१२ तर ठाण्यात २५३३१ एक्टिव्ह रुग्ण आहेत. ही बाब ठाणे जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. ठाणे जिल्ह्यात येणाऱ्या नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याशिवाय, प्रत्यक्ष ठाण्यातही वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ ओढावली होती.

दुसरीकडे कल्याण डोंबिवलीत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असतानाच काल बाधितांच्या एकूण आकड्याने ८ हजारांचा टप्पा पार केला आहे. कालपर्यंतचे सर्वाधिक ५६४ नवे रुग्ण सापडले आहेत. त्याआधी हाच आकडा ५६० होता. तर, काल दिवसभरात ३ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

 

News English Summary: It became clear that Thane district has surpassed Mumbai in the number of active patients. At present there are 24912 active patients in Mumbai and 25331 in Thane. This matter is being considered as a wake-up call for Thane district.

News English Title: Thane district takeover Mumbai city in active Corona virus cases News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x