27 September 2023 1:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ganesh Pandal Fire | पुण्यात गणेश मंडपाला आग, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि बावनकुळे देखील मंडपात उपस्थित होते GTL Infra Vs Sonu Infra Share | जीटीएल इन्फ्राला ऑर्डर मिळेना, पण सोनू इन्फ्राटेक कंपनीला रिलायन्ससह अनेक ऑर्डर्स, स्वस्त शेअर सुसाट तेजीत Zen Tech Share Price | मार्ग श्रीमंतीचा! झेन टेक्नॉलॉजी शेअरने अवघ्या 9 महिन्यात 317 टक्के परतावा दिला, भरवशाचा स्टॉक खरेदी करणार? Multibagger Stocks | एलटी फूड्स शेअरने अल्पावधीत 75 टक्के परतावा दिला, हा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी, कारण काय? Tata Power Share Price | पॉवर सेक्टर स्टॉकमध्ये जोरदार तेजी, विजेच्या वाढत्या मागणीचा फायदा टाटा पॉवर शेअरला होणार? Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 27 सप्टेंबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! सणासुदीच्या दिवसात सोन्याचे भाव धडाम झाले, घसरण सुरूच, आज किती स्वस्त झाले सोन्याचे दर जाणून घ्या
x

Motorola G42 | मोटोरोला जी 42 स्मार्टफोन भारतात लाँच होणार | 50 मेगापिक्सल कॅमेरा | किंमत आणि वैशिष्ठ्ये पहा

Motorola G42 smartphone

Motorola G42 | स्मार्टफोन निर्माता कंपनी मोटोरोला आपला स्वस्त स्मार्टफोन मोटोरोला जी ४२ ४ जुलै रोजी भारतात लाँच करणार आहे. मोटो जी ४२ हे नुकतेच ब्राझीलमध्ये लाँच करण्यात आले असून, ते अशाच फिचर्ससह भारतात सादर केले जाण्याची शक्यता आहे. ब्राझीलमध्ये मोटोरोला जी ४२ ची सुरुवातीची किंमत बीआरएल १,६९९ आहे जी अंदाजे २५,५०० रुपयांच्या बरोबरीची आहे. जाणून घेऊयात कोणत्या फिचर्ससह हा स्मार्टफोन लाँच केला जाऊ शकतो.

हे फीचर्स असू शकतात :
१. मोटो जी ४२ स्मार्टफोनमध्ये ६.४ इंचाचा १०८०पी एमोलेड डिस्प्ले देण्यात आला असून, मध्यभागी होल पंच कटआउट आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६८० चिप देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉयड १२ वर आधारित असून यात डॉल्बी अॅटमॉस प्लेबॅक सपोर्टसह स्टिरिओ स्पीकर मिळतो.
२. फोटोग्राफीसाठी, मोटो जी 42 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात मागील बाजूस 50 एमपी मुख्य सेन्सर आहे. फ्रंटमध्ये, यात 16 एमपीचा सेल्फी शूटर देण्यात आला आहे.
३. फोनमध्ये २० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५,००० एमएएच बॅटरी आहे. हे दोन कलर ऑप्शनमध्ये येईल – अटलांटिक ग्रीन आणि मेटॅलिक रोज. मोटो जी 42 ला आयपी 52 रेटिंग मिळाले आहे.
४. फ्लिपकार्टवरील फोनच्या प्रोडक्ट लिस्टनुसार, भारतात येणारा मोटोरोला जी 42 व्हेरिएंट 64 जीबी स्टोरेजसह येणार आहे. याचा विस्तार १ टीबीपर्यंत करता येतो.

काय असू शकते किंमत :
मोटो जी 42 ची किंमत मोटो जी 52 पेक्षा थोडी कमी असू शकते, जी 14,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केली गेली होती. मोटो जी ५२ मध्ये ६.६ इंचाचा १०८० पी पोएलईडी डिस्प्ले असून ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६८० चिपसह ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी यूएमसीपी (यूएफएस-आधारित मल्टीचिप पॅकेज) स्टोरेज आहे. ती वाढवून १ टीबी करता येते. यात ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५,० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. कॅमेर् याबद्दल बोलायचे झाले तर, मोटो जी 52 मध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 50 एमपी मेन, 8 एमपी अल्ट्रा-वाइड-अँगल आणि दुसरा 2 एमपी मॅक्रो सेन्सर आहे. फ्रंटला मोटो जी 52 मध्ये 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Motorola G42 smartphone will be launch on 4 July in India check price on Flipkart check details 29 June 2022.

हॅशटॅग्स

#Motorola G42 smartphone(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x