13 December 2024 2:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

फडणवीसांच्या काळातील 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेची होणार चौकशी - उपमुख्यमंत्री

Plantation program, Ajit Pawar, Announces probe, Devendra Dadnavis

मुंबई, ०३ मार्च: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा विधिमंडळात महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा सामना पाहायला मिळाला. तिसऱ्या दिवसाची सुरुवातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या खडाजंगीने झाली. भारतीय जनता पक्षाच्या सत्तेत असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील वृक्षारोपण मोहिमेवर नाना पटोले यांनी सवाल उपस्थित केले. तसेच चौकशीची मागणी सुद्धा केली. त्यावर वाद होत असतानाच सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याची चौकशी होणार असल्याचे सांगत फडणवीसांना दणका दिला.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना ३३ कोटी वृक्ष लागवडीची मोहिम राबवण्यात आली होती. २०१६ ते २०१७ आणि २०१९-२० या कालावधीत वन विभागाने वृक्ष लागवड योजनेत २८.२७ कोटी वृक्ष लावले. त्यानंतर ऑक्टोबर २०२० च्या शेवटी त्यापैकी ७५.६३% रोपटे म्हणजे २१ कोटी रोपटे जिवंत आहेत. त्याची अजुनही देखभाल करण्यात येत आहे. २०१७ ते २०१९ कालावधीत वन विभागाने व्यक्ती, संस्था, सरकारी संस्था, संघटना आणि उद्योग समूहांच्या माध्यमातून ५० कोटी वृक्ष लावण्याची मोहीम राबवली. यासाठी २०१६-२०१७ पासून २०१९-२०२० पर्यंत २ हजार ४२९ कोटी ७८ लाख रुपये निधी मिळवला आणि तो पूर्ण निधी वापरण्यात आला. त्यातील 25 टक्के रोपटे जिवंत कशी राहू शकली नाहीत याची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी दत्तात्रय भरणे यांनी केली. तीच उचलून धरताना याची विधिमंडळाकडून चौकशी व्हावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

दरम्यान यावरून देवेंद्र फडणवीस यांनी देखील पलटवार केला आणि दोन्ही नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगले. त्यात सुधीर मुनगंटीवार यांनी उडी घेत वृक्ष लागवड हे एक ईश्वरीय कार्य असल्याचे सांगितले. सोबतच वडेट्टीवारांनी सुद्धा याबाबत चौकशी करायला सांगितली. याबद्दल समिती किती दिवसांत स्थापित होणार आणि किती दिवसांत अहवाल येणार अशी विचारणा मुनगंटीवार यांनी केली. त्यानंतर मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 33 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेची विधिमंडळाच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी होणार अशी घोषणाच केली.

 

News English Summary: Even on the third day of the budget session, the legislature witnessed a match between Mahavikas Aghadi and Bharatiya Janata Party. The third day started with a scuffle between Congress state president Nana Patole and opposition leader Devendra Fadnavis. Nana Patole questioned the tree planting campaign of the then Chief Minister Devendra Fadnavis when the BJP was in power. He also demanded an inquiry. While the debate was going on, Deputy Chief Minister Ajit Pawar slammed Fadnavis saying that he would be questioned.

News English Title: Plantation program probe Ajit Pawar announces probe in 33 crore plantation in Devendra Dadnavis regime news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x