13 December 2024 5:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल
x

Ashok Leyland Share Price | भरवशाचा अशोक लेलँड शेअर तेजीत येणार, कंपनी ऑर्डरबुक मजबूत, महत्वाची अपडेट आली

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी-मंदीचे चक्र फिरू लागले आहे. कंपनीने नुकताच आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. या तिमाहीत कंपनीने जबरदस्त कामगिरी केली आहे. अशोक लेलँड कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीत मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 2.5 टक्के वाढीसह 9273 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

डिसेंबर तिमाहीत या कंपनीने मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 60 टक्क्यांच्या वाढीसह 580 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आज बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी अशोक लेलँड स्टॉक 0.28 टक्के घसरणीसह 179.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अशोक लेलँड कंपनीने डिसेंबर तिमाहीत जबरदस्त कामगिरी केली आहे. अशोक लेलँड कंपनीवर 1747 कोटी रुपये कर्ज असून कंपनीचा डेट इक्विटी रेशो 0.2 पट आहे. मागील तिमाहीत हे प्रमाण 0.3 पट होते. या कंपनीने इलेक्ट्रिक लाईट कमर्शियल व्हेहिकल आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात व्यवसाय विस्तार करण्यासाठी डिसेंबर तिमाहीत 662 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. अशोक लेलँड कंपनी आपल्या मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहन आणि हलके व्यावसायिक वाहन विभागांच्या वाढीवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे.

अशोक लेलँड ही कंपनी भारतातील सर्वात मोठी बस उत्पादक कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. या कंपनीला डिसेंबर तिमाहीत 3800 बसेसचा पुरवठा करण्याची ऑर्डर मिळाली होती. भारतातीय बस मार्केटमध्ये अशोक लेलँड कंपनीचा मार्केट शेअर सातत्याने वाढत आहे. मागील 1 वर्षात अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 16.47 टक्के नफा कमावून दिला आहे.

तज्ज्ञांचे मते, चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते अशोक लेलँड स्टॉक पुढील काळात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सप्रमाणे वाढू शकतो. म्हणून तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashok Leyland Share Price NSE Live 07 February 2024.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(66)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x