25 April 2024 2:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा Reliance Home Finance Share Price | 3 रुपयाचा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, अवघ्या 2 दिवसात 10% परतावा, खरेदीला गर्दी Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर सुसाट धावतोय, हा शेअर अल्पावधीत पैसे गुणाकारात वाढवतोय Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे 10 पेनी शेअर्स, अप्पर सर्किट हीट गतीने पैसा वाढतोय Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर चार्टवर मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

अनेक नगारिक कोविन अ‍ॅप वर केवळ रजिस्ट्रेशन करत आहेत, पण मेसेज आला नसतानाही लसीकरण केंद्रावर

CoWIN app registration

मुंबई, १ मे | भारतामध्ये आजपासून तिसर्‍या आणि सर्वात मोठ्या लसीकरण टप्प्याला सुरूवात झाली आहे. यामध्ये आता 18 वर्षांवरील सार्‍यांचं लसीकरण सुरू झालं आहे. पण लसीकरणासाठी नोंदणीच्या तुलनेत लसींचा साठा कमी पडत असल्याने अनेक ठिकाणी गोंधळ होत आहे. प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये वाद होणं, नागरिकांना उन्हा तान्हात ताटकळत उभं राहणं आणि अनेकदा प्रतिक्षा करूनही लस न मिळाल्याने निराश होऊन परत जाणं अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आज मुंबई च्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नागरिकांना लसीकरणासाठी घाई, गोंधळ, गडबड न करण्याचं आवाहन केले आहे.

दरम्यान किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर नगारिकांनी कोविन अ‍ॅप वर रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हांला मेसेज येईपर्यंत थांबा. जर तुम्हांला मेसेज आला तरच लसीकरण केंद्रावर पोहचा. अनावश्यक गर्दी टाळा. जर मेसेज मिळाला नाही तर केंद्रांवर जाणं थांबवा असेही त्यांनी सांगितलं आहे. यासोबतच मुंबईमध्ये लसींचा पुरवठा मर्यादित असल्याने 45 वरील नागरिकांच्या दुसर्‍या डोस साठी प्राधान्य दिले जाणार आहे असे देखील त्या म्हणाल्या आहेत.

तरूणांसाठी आजपासुन लसीकरण सुरू होणार आहे. आज मुंबई मध्ये 1 ते 6 या वेळेत तरूणांचे 5 हॉस्पिटल मध्ये लसीकरण होणार आहे. पण त्यांनी देखील लसीकरणाच्या मेसेजची वाट पहावी. लसीकरण केंद्रं ही लसींचा पुरवठा मिळाल्यानंतरच खुली केली जातील असं त्यांनी स्पष्ट केल्याने वेळे आधी पोहचून गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

 

News English Summary: If citizens have registered on the Covin app, wait until you receive the message. Only reach the vaccination center if you receive a message. Avoid unnecessary crowds. If the message is not received, stop going to the centers, she said. She also said that due to limited supply of vaccines in Mumbai, preference will be given to the second dose for citizens above 45 years.

News English Title: People who have registered on CoWIN app & received a message can go to vaccination centres said BMC Mayor Kishori Pednekar news updates.

हॅशटॅग्स

#Vaccination(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x