बॉलिवूडकरांवर आयकर विभागाच्या धाडी | अनेक मोदी विरोधक कलाकार रडारवर?
मुंबई, ०३ मार्च: आयकर विभागाने मुंबईत अनेक बॉलिवूडकरांवर धाडी टाकल्या आहेत. यामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू, दिग्दर्शक- निर्माता अनुराग कश्यप आणि ‘क्वीन’चा निर्माता विकास बहलच्या घरी इनकम टॅक्स विभागाने धाड टाकली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी हे धाडसत्र सुरु आहे. अचानक पडलेल्या या धाडीने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मोदी आणि मोदी समर्थकांचे विरोधक असणारे कलाकार यामध्ये अधिक असल्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरु झाली आहे.
अनुराग, तापसी, विकास बेहेल, मधू मंटेना यांच्यासह अनेक बड्या कलाकारांची मालमत्तांवर प्राप्तिकर विभागानं छापे टाकले आहेत. फँटम फिल्म्सनं केलेल्या करचोरी प्रकरणात छापेमारी सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अनुराग, विकास आणि मधू फँटम फिल्म्सचे संस्थापक आहेत. फँटमची मालकी अनुरागकडे आहे. मुंबई आणि पुण्यात २२ ठिकाणांवर सध्याच्या घडीला प्राप्तिकर विभागाचं धाडसत्र सुरू आहे.
Income Tax raids underway at the properties of film director Anurag Kashyap and actor Taapsee Pannu in Mumbai: Income Tax Department
— ANI (@ANI) March 3, 2021
आयकर विभागाने बुधवारी दुपारी अनुराग कश्यप आणि तापसी पन्नूच्या मालमत्तांवर छापे मारले. ‘फँटम फिल्म’शी संबंधित लोकांच्या घरांवर या धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मधू मंटेना यांची कंपनी ‘क्वान’ यांच्या कार्यालयावरही छापे मारण्यात आले. कर चुकवल्याच्या आरोपाखाली हे छापे टाकण्यात आले असून, मुंबईतील तब्बल २२ ठिकाणांची झाडाझडती आयकर विभागाकडून घेतली जात आहे.
News English Summary: The income tax department has raided several Bollywood stars in Mumbai. The Income Tax department has raided the homes of actress Tapsi Pannu, director-producer Anurag Kashyap and Vikas Bahl, producer of ‘Queen’. The campaign is underway in many places in Mumbai. The sudden fall has caused a stir in Bollywood. What is special is that the discussion has started on social media that there are more artists who are opposed to Modi and his supporters.
News English Title: Income Tax raided on Bollywood film directors Anurag Kashyap and actress Taapsee Pannu home news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा