मुंबई : सर्वच शहरांमध्ये रोजच्या जीवनाश्यक वस्तुंचे दर गगनाला भिडले असून त्यात भाजीपाल्यासारख्या वस्तू महागण्याची शक्यता. आधीच कालपासून राज्यातील शेतकऱ्यांच्या संपानंतर आता संपूर्ण देशातील शेतकरी संपावर गेल्याने दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांकडून शेतमालाची विक्री बंद करण्यात आली आहे.
मुंबईच्या दादर मंडईमध्ये केवळ निम्म्याच शेतमालाच्या गाड्या शनिवारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी भाज्यांचे दर कडाडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांचा संप असाच १० दिवस सुरु राहिल्यास महागाईचा भस्मासुर उभा राहील. शेतकरी संपावर सरकारला तोडगा काढण्यात यश येत नसल्याने भाजी व्यापारी सुद्धा धास्तावले आहेत.
महागाई केवळ भाजी पाल्यापुरतीच मर्यादित नसून पेट्रोल, डिझेल, गॅस आणि रोजच लागणार दूध सुद्धा महागल्याने सामान्यांचे महागाईने चांगलेच कंबरडे मोडले आहे. आम्ही महागाई कमी करू अशा फुशारक्या मारत सत्तेत आलेलं भाजप शिवसेनेचं सरकार महागाई रोखण्यात अक्षरशा नापास झाल्याचं चित्र आहे.
