9 August 2022 7:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Modi Govt Failure | खाजगी आरोग्य विमा कंपन्या नफ्यात, तर सरकारी आरोग्य विमा कंपन्यांना 5 वर्षांत 26,364 कोटीचा तोटा Gold ETF Benefits | पेपर गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याचा उत्तम मार्ग, त्याचे फायदे आणि युनिट कसे खरेदी करावे जाणून घ्या Horoscope Today | 10 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Nippon Mutual Fund | ही म्युचुअल फंड योजना देत आहे भरघोस परतावा, पैसा वेगाने वाढविण्यासाठी गुंतवणुकीचा विचार करा Motorola G32 Smartphone | मोटोरोला G32 स्मार्टफोन लाँच, 50 एमपी कॅमेरा, किंमत आणि बरंच काही जाणून घ्या Investment Scheme | रोज फक्त 200 रुपये बचत करा, तुम्हाला 2 कोटी 11 लाख रुपयांचा परतावा मिळेल WhatsApp Updates | व्हॉट्सॲपमध्ये होणार मोठे बदल, या मेसेजेसचे स्क्रीनशॉट्स काढू शकणार नाही
x

GST Collection | सलग तिसऱ्या महिन्यात GST संकलन विक्रम | थेट 1.17 लाख कोटी रुपयांवर

GST collection

नवी दिल्ली, ०२ ऑक्टोबर | नुकत्याच संपलेल्या सप्टेंबर महिन्यात जीएसटी संकलन (GST Collection) सलग तिसऱ्या महिन्यात १ लाख काेटी रुपयांवर म्हणजे १,१७,०१० काेटी रुपयांवर गेले आहे. सप्टेंबर २०२० च्या तुलनेत २३ टक्के आणि काेविडपूर्व पातळी म्हणजे सप्टेंबर २०१९ च्या तुलनेत ते २७ टक्के जास्त आहे. ही आकडेवारी देशाच्या परिस्थितीत लक्षणीय सुधारणा हाेत असल्याचे द्याेतक आहे. या अगाेदर ऑगस्टमध्ये जीएसटी संकलन १.१२ लाख काेटी रुपये तर जुलैमध्ये १.१६ लाख काेटी रुपये झाले हाेते. या बळावर चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जीएसटीचे सरासरी संकलन दरमहा १.१५ लाख कोटी रुपये होते. पहिल्या तिमाहीत ते १.१० लाख कोटींच्या सरासरी संकलनापेक्षा५ % जास्त आहे. यामुळे सरकारला खर्च वाढण्यास मदत होईल.

GST Collection, the gross GST revenue collected in September stood at Rs 1,17,010 crore, a growth of 23 percent over the same month last year. It is also higher than last month’s collection of Rs 1,12,020 crore :

संकलन वाढण्याचे कारण:
* गेल्या काही महिन्यांतील वेगवान आर्थिक वाढ
* करचोरीच्या विरोधात जोरदार मोहीम
* देशातील ग्राहकांच्या मागणीत झपाट्याने वाढ

दुसऱ्या सहामाहीतही हाच कल राहील : अर्थ मंत्रालय
अर्थव्यवस्थेची गाडी पुन्हा वेगाने रुळावर येत असल्याचे संकेत जीएसटीच्या अाकडेवारीवरून मिळतात. दुसऱ्या सहामाहीत जीएसटी संकलनात वाढ कायम राहील, असा विश्वास अर्थ मंत्रालयाने व्यक्त केला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: GST collection for September over 1 17 lakh crore says union finance ministry.

हॅशटॅग्स

#GST(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x