27 April 2024 10:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

देशातील आर्थिक मंदी मुघल व इंग्रजांमुळे; मोदींनी परिवर्तन केलं: योगी आदित्यनाथ

Mughals, British, Slowdown in Economy, Recession, yogi adityanath, narendra modi, bjp

मुंबई: देशात सध्या सर्वच बाजूंनी बेरोजगारी वाढत असताना सरकारसमोरील अडचणी देखील वाढताना दिसत आहेत. नोटबंदी आणि केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे बेरोजगारीचा आकडा दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. मागील काही महिन्यांपासून देशात बेरोजगारी ऐतिहासिक आकडे गाठताना दिसत आहे. ऑटो, बांधकाम, टेक्सटाईल अशा मोठा रोजगार देणाऱ्या उद्योगांना घरघर लागलेली असताना आता त्यात शेअर बाजारातील शेअर खरेदी विक्री संबंधित कंपन्यांना सुद्धा मोठा फटका बसताना दिसत आहे.

देशांतर्गत लघु उद्योग आधीच मोठ्या अडचणीत असल्याने छोटे रोजगार देखील मिळताना दिसत नाही आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ देखील पोषक नसल्याने परिस्थिती अजून कठीण होण्याची भीती तत्ज्ञांनी व्यक्त केली आहे. असं असलं तरी विदेशातील दौर्यात नरेन्द्र मोदी भारतात सर्वकाही ठीक असल्याचे दाखवत आहे.

महिन्यांपूर्वी CMIE ने प्रसिद्ध केलेल्या बेरोजगारीच्या अहवालानुसार, देशात बेरोजगारीचा दर एप्रिलच्या तीन हप्त्यांमध्ये ७.९ टक्क्यांहून ९.१ टक्क्यांवर पोहोचला आहे. हा दर गेल्या दोन वर्षांतील बेरोजगारीचा उच्चांक आहे. सीएमआयई (सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी) द्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली होती.

त्यावेळच्या रिपोर्टनुसार, देशात नोटाबंदी आणि जीएसटीनंतर जवळपास चार ते पाच कोटी लोकांना नोकरी गमवावी लागली आहे. गेल्या निवडणुकीत मोदींनी २ कोटी लोकांना रोजगार देणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. परंतु मोदींना नवीन रोजगार उपलब्ध करता आले नाहीत. उलट नोटाबंदीमुळे रोजगार असलेले लोकही बेरोजगार झाले. त्यामुळे विरोधकांनी देखील मोदी सरकारला धारेवर धरल्याचे पाहायला मिळले होते. असं असलं तरी भाजपचे जवाबदार नेते देखील न पचणारी उदाहरणं देऊन स्वतःची हशा करून घेत आहेत.

मुघल सम्राट आणि ब्रिटिशांनी भारतावर हल्ले केल्याने भारतामध्ये आर्थिक मंदी आल्याचे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. ‘मुघल काळ सुरु होण्याआदी भारताचा जागतिक व्यापारामधील हिस्सा हा ३६ टक्क्यांपर्यंत होता. त्यानंतर भारतामध्ये इंग्रजांचे आगमन झाले आणि हा हिस्सा २० टक्क्यांपर्यंत कमी झाला. मुघल आणि ब्रिटिशांमुळेच भारतामध्ये आर्थिक परिस्थितीमध्ये घसरण झाली,’ असं मत योगी यांनी मुंबईत बोलताना नोंदवले ते वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरममध्ये (डब्ल्यूएचईएफ) बोलत होते.

देशामध्ये आर्थिक मंदीची स्थिती निर्माण झाली असतानाच मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या डब्ल्यूएचईएफ परिषदकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. ‘भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही अर्थतज्ज्ञांनी भारतामधील आर्थिक विकास कमी दराने होत असतानाच त्याचा उल्लेख हिंदू ग्रोथ रेट असा केला होता. मात्र इंग्रजांना महान समजणाऱ्यांनी भारताचा विकास दर केवळ चार टक्कांवर आणला. मात्र मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर परिवर्तन झाले आहे,’ असं मत योगी यांनी मांडले.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x