12 December 2024 6:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Neelam Gorhe | विधानसभेत निवडून येणं शक्य नसणाऱ्या आणि विधान परिषद भरोसे राजकारण करणाऱ्या महिला नेत्याचा शिंदे गटात प्रवेश होणार

MNC Neelam Gorhe

Neelam Gorhe | राज्यातील राजकारणात वर्षभरापासून एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद असल्याने सत्तेच्या गुळाकडे मुंगळे चिकटतात तसे प्रकार असून सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार गेल्यानंतर अनेक धक्के उद्धव ठाकरे यांना बसले आहे. आता शिवसेना ठाकरे गटातून आणखी एक नेत्या शिंदे गटात दाखल होणार आहे. हा प्रवेश शुक्रवारीच होण्याची शक्यता आहे. मात्र त्याने ठाकरे गटाला गटाला आगामी कोणताही फरक पडेल असं दिसत नाही. कारण या नेत्याचं स्वतःच्या हिंमतीवर निवडणून येण्याइतकं मोठं राजकीय राजकीय वजन नाही. या महिला नेत्याचं राजकारण हे पूर्णपणे विधान परिषद भरोसे निवडून जाण्यावर अवलंबून असल्याचे राजकीय तज्ज्ञ सांगतात.

शिंदे गटाला पोषक राजकीय हालचाली

नागपूर अधिवेशनात उद्धव ठाकरे यांच्याकडे काही आमदारांनी तक्रार केल्यानंतर हे सगळं नाराजीनाट्य सुरु झाल्याचे म्हटलं जात आहे. उपसभातपी असून देखील आमदारांना त्या बोलू देत नाही अशी तक्रार करण्यात आली होती. याची दखल देखील उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. त्यानंतर त्यांची शिंदे गटासोबत जवळीक वाढल्याची चर्चा सुरु झाली होती.

सर्वकाही पुण्यात पण शिवसेना काय त्यांनी पुण्यात वाढवली नाही

नीलम गोऱ्हे या सध्या विधानपरिषदेच्या उपसभापती आहेत. विधानपरिषदेत त्यांनी शिवसेनेच्या प्रतोद म्हणून काम पाहिलं आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि उपनेतेपदही त्यांच्याकडे आहे. शिवसेना नेत्या म्हणून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आदी भागात त्यांनी काम केलं आहे. शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. पण त्यांच्या कारकिर्दीत शिवसेना पक्ष कधीच पुण्यात वाढल्याचं पाहायला मिळालं आहे.

विधानपरिषद सदस्या

2002 ते 2008, 2008 ते 2014, 2004 ते आजपर्यंत विधानपरिषद सदस्या म्हणून कार्यरत आहेत. जून 2019 मध्ये उपसभापतीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. महाराष्ट्र विधानमंडळात तब्बल 55 वर्षानंतर विधानपरिषदेवर पहिल्या महिला उपसभापतीपदी बसण्याचा मान त्यांना ठाकरेंमुळे मिळालेला आहे. नीलम गोऱ्हे यांना 2014 च्या युती सरकारच्या काळात मंत्री मिळेल अशा चर्चा होत्या परंतु त्यांना मंत्रीपदाने हुलकावणी दिली होती. मात्र विधासभेत निवडून येतील किंवा दुसऱ्याला निवडून आणतील एवढ त्यांची राजकीय ताकद नसल्याचे राजकीय तज्ज्ञ सांगतात. म्हणून त्या पुढे पुन्हा विधानपरिषदेवर जाण्यासाठी शिंदे गटात गेल्या असाव्या असं म्हटलं जातंय.

News Title : MNC Neelam Gorhe to join Shinde Camp check details on 07 July 2023.

हॅशटॅग्स

#MNC Neelam Gorhe(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x