26 May 2022 7:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

मुंबई क्रिकेट असोसिएशन कडून पृथ्वी शॉ ला मोठं बक्षीस.

मुंबई : बलाढ्य ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवून चौथ्यांदा अंडर १९ वर्ल्ड कप नावावर करणाऱ्या अंडर-१९ टीम इंडियाचा कर्णधार पृथ्वी शॉ ला मुंबई क्रिकेट असोसिएशन कडून मोठं बक्षीस जाहीर झालं आहे. आधी बीसीसीआय आणि आता मुंबई क्रिकेट असोसिएशन ने बक्षीस घोषित केलं आहे.

या आधी बीसीसीआयने भारतीय संघाच्या खेळाडू, प्रशिक्षक आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफ साठी बक्षीस देण्याची घोषणा केली होती. त्यात सर्व खेळाडूंना ३० लाख, संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडला ५० लाख तर सपोर्ट स्टाफला २० लाखांचे बक्षीस घोषित केले होते. त्यात आता मुंबई क्रिकेट असोसिएशन ने कर्णधार पृथ्वी शॉ याला २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

तशाप्रकारचे अधिकृत ट्विट स्वतः भाजप आमदार आशिष शेलार यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x