9 October 2024 3:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मालामाल करणार हा स्टॉक - Marathi News Gold Rate Today | खुशखबर! सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Marathi News Pension Life Certificate | डोअरस्टेप बँकिंग सर्विसच्या माध्यमातून जमा करा 'लाईफ सर्टिफिकेट', घरबसल्या होईल काम IPO GMP | पैसे तयार ठेवा, सर्वात मोठा IPO लाँच होतोय, ₹13720 मध्ये मिळेल 1 लॉट, संधी सोडू नका - Marathi News Singham Again Trailer | 'एक वचन के लिए वो लंका जलाने वाला है', 'सिंघम अगेन' मध्ये पाहायला मिळणार रामायणची झलक BEL Share Price | मल्टिबॅगर PSU BEL शेअर पुन्हा रॉकेट होणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Aditya Birla Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना 3200 बचतीवर मिळेल 1 कोटी रुपये परतावा
x

Home Loan EMI | गृहकर्जाचा डोंगर हलका करायचा असेल तर, या 9 स्टेप्स फॉलो करा, EMI सुद्धा होईल कमी - Marathi News

Highlights:

  • Home Loan EMI
  • कमी काळाचे लोन निवडा :
  • एकदम पेमेंट करा :
  • द्वि-साप्ताहिक पेमेंटचं ऑप्शन निवडा :
  • एक्स्ट्रा मंथली पेमेंट :
  • बँकेच्या संपर्कात रहा :
  • तुमच्या बजेटचं नियोजन करा :
  • नवीन कर्ज घेऊ नका :
  • बोनस मिळत असेल तर आणखीनच उत्तम :
  • कमी व्याजदरावर लोन ट्रान्सफर करा :
Home Loan EMI

Home Loan EMI | होम लोन घेणे अत्यंत सोपे आणि फायद्याचे असते. परंतु हे दीर्घकाळाचं लोन फेडण्यासाठी अनेकांच्या नाकी 9 येतात. आज आम्ही तुम्हाला गृहकर्ज लवकरात लवकर कसं फेडलं जाईल याबाबतच्या 9 गोष्टी सांगणार आहोत. आम्ही सांगितलेल्या गोष्टींचा वापर करून तुम्ही दिलेल्या कार्यकाळाच्या आधीच गृहकर्ज फेडून कर्जापासून मुक्त व्हाल.

दरम्यान भारताची सर्वात मोठी प्रायव्हेट बँक म्हणजेच एचडीएफसी बँक. या बँकेने 2024 च्या जानेवारी महिन्यापासून हळूहळू होमलोनवर इंटरेस्ट वाढवणे सुरू केले आहे. त्याचबरोबर मागील वर्षाच्या एप्रिल महिन्यापासून रेपो रेटमध्ये देखील कोणत्याही प्रकारचे बदल घडून आलेले दिसले नाही आणि अजूनही आरबीआयच्या पॉलिसीतील रेपो रेट बदललेले नाहीयेत. या सर्वांमध्ये तुम्ही होम लोन घेतलं असेल आणि ईएमआयला कंटाळले असाल तर, या 9 स्टेप फॉलो करून लवकरात लवकर कर्जातून मुक्त व्हा.

1) कमी काळाचे लोन निवडा :
तुम्हाला लवकरात लवकर लोन फेडायचं असेल तर, तुम्ही कमी काळाचे लोन घेतले पाहिजे. म्हणजेच लोन फेडण्यासाठी 20 ऐवजी केवळ 15 वर्षांचा कार्यकाळ तुम्ही निवडला पाहिजे. असं झाल्यावर तुम्हाला जास्तीचे लोन भरावे लागू शकते परंतु तुमचे लोन कमी दिवसांत फेडून होऊ शकते आणि तुम्ही कर्जातून मुक्त देखील होऊ शकता. लवकर लो फेडल्यामुळे तुम्ही व्याज वाढीची बचत करू शकता.

2) एकदम पेमेंट करा :
तुम्ही ईएमआय भरून कंटाळला असाल आणि तुम्हाला लवकरात लवकर कर्जापासून मुक्तता हवी असेल तर, तुम्ही एकदम डाऊन पेमेंट करून पैसे भरू शकता. यामध्ये कर्जाच्या वेळी तुम्हाला कमी पेमेंट करावे लागेल त्याचबरोबर ईएमआय देखील कमीच भरावा लागेल.

3) द्वि-साप्ताहिक पेमेंटचं ऑप्शन निवडा :
बऱ्याच बँकांकडून द्वि-साप्ताहिक पेमेंटचं ऑप्शन दिलं जातं. या ऑप्शनमुळे तुमच्या वार्षिक पेमेंटची संख्या वाढत जाते. या प्रक्रियेमुळे रीपेमेंट प्रक्रिया सोपी होऊन जाते.

4) एक्स्ट्रा मंथली पेमेंट :
प्रत्येक महिन्याला पेमेंट करताना एक्स्ट्रा पैसे भरत जा. जेणेकरून प्रत्येक महिन्याला थोडं थोडं जास्तीचं पेमेंट करत राहिल्याने मुलधन कमी येतं आणि रिपेमेंटचा कार्यकाळदेखील कमी होतो.

5) बँकेच्या संपर्कात रहा :
तुम्ही लोनविषयी कायम बँकेच्या संपर्कात राहिले पाहिजे. लवकरात लवकर लोन फेडल्यामुळे कोणकोणते लाभ अनुभवता येतात याविषयी स्वतःजवळ माहिती ठेवा. जेणेकरून तुम्हालाही लवकरात लवकर पेमेंट केल्याचा फायदा अनुभवता येईल.

6) तुमच्या बजेटचं नियोजन करा :
तुम्ही तुमच्या बजेटचं नियोजन केले पाहिजे. यासाठी तुम्ही तुमचा बजेट ठरवून कोणत्या क्षेत्रामध्ये कमी पैसे खर्च होऊ शकतात याकडे लक्ष दिले पाहिजे. असं केल्याने तुम्ही लवकरात लवकर लोनफेडून काही रक्कम वाचवून ठेवू शकता.

7) नवीन कर्ज घेऊ नका :
आधीच होम लोनसारखं मोठं कर्ज फेडत असताना कोणतही नवीन कर्ज घेऊ नका. नाहीतर तुम्ही कर्जबाजारी नाही. त्याचबरोबर तुम्हाला कर खर्चासाठी काहीही शिल्लक उडणार नाही.

8) बोनस मिळत असेल तर आणखीनच उत्तम :
समजा तुम्हाला टॅक्स, रिफंड किंवा बोनस मिळत असेल तर, तुम्ही हे पैसे लोन फेडण्याकडे वळवू शकता. असं केल्याने तुमच्याकडचे स्वतःचे पैसे व्याजासाठी खर्च होणार नाहीत आणि होम लोन देखील वेळेवर फेडले जाईल.

9) कमी व्याजदरावर लोन ट्रान्सफर करा :
समजा तुम्ही ज्या बँकेकडून लोन घेतलं आहे ती बँक जास्तीचे व्याजदर आकारत असेल तर, तुम्ही तुमचं लोन दुसऱ्या बँकेमध्ये ट्रान्सफर करून घेऊ शकता. असं केल्याने तुम्हाला व्याजाचे कमीत कमी पैसे भरावे लागतील. जेणेकरून तुम्हाला थोडीफार बचतही करता येईल.

Latest Marathi News | Home Loan EMI 01 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Home Loan EMI(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x