9 October 2024 4:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | जबरदस्त कमाई होणार, वेदांता कंपनीबाबत अपडेट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन शेअर ओव्हरसोल्ड झोन जवळ, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, तज्ज्ञांनी दिला सल्ला - Marathi News Jio Finance Share Price | मालामाल करणार जिओ फायनान्शियल शेअर, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News TTML Share Price | 2975% परतावा देणारा TTML शेअर पुन्हा फोकसमध्ये, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - Marathi News Vodafone Idea Share Price | 9 रुपयाचा पेनी शेअर 3 महिन्यात 43% घसरला, पुढे काय, स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचे तिकीट बुक करण्याआधी एक काम करा, स्लीपर कोचच्या पैशात AC मधून प्रवास कराल IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर आला फोकसमध्ये, 343% परतावा देणारा स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News
x

Post Office Saving Scheme | पोस्टाची भन्नाट योजना, दर महिन्याला छप्परफाड कमाई करा, गुंतवा केवळ 1,000 रूपये - Marathi News

Highlights:

  • Post Office Saving Scheme
  • योजनेमध्ये पैसे गुंतवण्याची लिमिट :
  • कोण उघडू शकतो अकाउंट :
  • किती टक्के व्याजदर मिळते :
  • मॅच्युरिटी पिरियड किती आहे :
Post Office Saving Scheme

Post Office Saving Scheme | पोस्टाच्या अंतर्गत अनेक छोट्या बचत योजना चालवल्या जातात. अनेक व्यक्ती पोस्टामार्फत सुरू असणाऱ्या योजनांचा लाभ घेऊन बक्कळ पैसे कमवत आहेत. अशातच आज आम्ही एका छोट्या बचत योजनेबद्दल सांगणार आहे. जिचं नाव पोस्ट ऑफिस मंथली स्कीम असं असून या योजनेत चक्क 1000 रूपये भरून देखील तुम्ही गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिस मंथलीस स्कीम या योजनेमधून तुम्ही प्रत्येक महिन्याला कमाई करू शकता.

आज आपण या लेखातून योजनेविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. भारताची ही योजना किती टक्के व्याजदर देते, त्याचबरोबर या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे अशा पद्धतीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर पाहूया.

योजनेमध्ये पैसे गुंतवण्याची लिमिट :
योजनेमध्ये पैशांच्या गुंतवणुकीची लिमिट सांगायची झाली तर तुम्ही कमीत कमी 1000 रुपये भरून देखील योजना सुरू करू शकता. त्याचबरोबर या गुंतवणुकीची जास्तीत जास्त लिमिट 9 लाख रुपयांपर्यंत आहे. जर तुम्ही जॉईंट अकाउंट ओपन करत असाल तर, ही लिमिट 15 लाख रुपयांनी एवढी ठेवण्यात आली आहे. तुम्ही जॉईंट अकाउंट ओपन केला असेल तर, सर्वांना समान पैसे मिळतील. त्याचबरोबर नाबालिकांसाठी उघडलेल्या खात्याची सीमा निश्चितच वेगळी असेल.

कोण उघडू शकतो अकाउंट :
पोस्टाच्या मंथली इनकम स्कीममध्ये कोणताही सिंगल आणि दोन वयस्कर व्यक्ती मिळून खाते उघडू शकतात. फक्त दोनच नाहीतर 3 व्यक्ती एकत्र येऊन देखील खातं उघडू शकतात. दरम्यान या योजनेमध्ये नाबालिक देखील स्वतःचं खातं उघडून अकाउंटमध्ये पैसे गुंतवू शकतात. नाबालिक आणि विक्षिप्त बुद्धिमत्तेच्या मुलांसाठी त्यांचे अभिभावक खाते उघडू शकतात.

किती टक्के व्याजदर मिळते :
पोस्टाच्या मंथली इन्कम स्कीममध्ये तुम्हाला चांगले व्याजदर दिले जाते. जेणेकरून व्याजदरानेच तुम्हाला जास्तीचे पैसे कमवता येतील. सध्याच्या घडीला या योजनेमध्ये सरकार 7.4% व्याजदर देत आहे. तुम्ही ज्या दिवशी अकाउंट ओपन केले असेल त्या दिवसापासून एक महिना पूर्ण झाल्यानंतर तुमच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा केली जाते.

समजा अकाउंट होल्डरने प्रत्येक महिन्याला व्याजाचा दावा केला नाही तर, व्याजावर व्याजाची रक्कम मिळणार नाही. त्याचबरोबर पैसे गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीने जास्तीची रक्कम जमा केली असेल तर, त्याला ती रक्कम परत केली जाते. त्याचबरोबर तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, तुम्हाला मिळणाऱ्या व्याजदरवर टॅक्स लागू केले जाते.

मॅच्युरिटी पिरियड किती आहे :
पोस्टाच्या पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्किम या योजनेचा मॅच्युरिटी पिरियड 5 वर्षांचा आहे. समजा मॅच्युरिटी पीरियडआधीच खातेधारकाचा मृत्यू झाला तर, हे अकाउंट बंद केलं जातं आणि जमा असलेली रक्कम संबंधित ओळखीच्या व्यक्तीला दिली जाते. त्याचबरोबर तुम्ही तुमचं खातं ओपनिंग तारखेच्या एक वर्षानंतर आणि तीन वर्षाआधी बंद करत असाल तर, मूलधनातून 2% कापून घेतले जातात आणि बॅलन्स राहिलेल्या पैशांचं पेमेंट केलं जातं.

Latest Marathi News | Post Office Saving Scheme 01 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Post Office Saving Scheme(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x