10 December 2024 7:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CIBIL Score | तुमच्याकडे सुद्धा एकापेक्षा अधिक पॅन कार्ड आहेत मग, तुमच्या क्रेडिट स्कोरवर होणार हा परिणाम - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळेत आणि नियमांमध्ये मोठा बदल; ही अपडेट ठाऊक आहे का Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, स्टॉक चार्टवर संकेत, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या Redmi Note 14 | Redmi Note 14 सिरीजची भारतात एंट्री; या तारखेपासून खरेदी करता येईल, किंमत आणि फीचर्स पाहून घ्या IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO BSNL Recharge | आता केवळ 58 रुपयांपासून मिळणार BSNL चे स्वस्तात स्वस्त प्लान; मोबाईल रिचार्जसाठी लक्षात ठेवा
x

Lakshmi Pujan | नवीन लग्न झालंय; लक्ष्मीपूजनची विधी माहित नाही, चिंता नको, या अचूक पद्धतीने करा लक्ष्मीपूजन - Marathi News

Lakshmi Pujan

Lakshmi Pujan | यंदाची दिवाळी आपल्या सर्वांसाठीच अतिशय महत्वाची आणि आनंदाची दिवाळी असणार आहे. कारण की ही दिवाळी 31 आणि 1 नोव्हेंबर या दोन्हीही दिवशी साजरी केली जाणार आहे. अशातच लक्ष्मीपूजन 1 तारखेला असून बऱ्याच महिला लक्ष्मीच्या पूजेकरिता योग्य साहित्याची खरेदी करत आहेत. परंतु यांपैकी काही महिला अशाही आहेत ज्यांना लक्ष्मीपूजनाच्या साहित्याविषयी अजिबात माहिती नाहीये.

लक्ष्मीची व्यवस्थित उपासना आणि पूजा केली तर, लक्ष्मीची कृपा पुढच्या दिवाळीपर्यंत म्हणजे संपूर्ण एक वर्ष किंवा आयुष्यभर आपल्यावर राहते. यासाठी तुम्हाला दररोज देवीची पूजा करावी लागेल. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवी महालक्ष्मी प्रत्येकाच्या घरामध्ये वास करत असते. प्रत्येकाच्या घरातील सुखदुःखाचा ती आढावा घेत असते. दरम्यान लक्ष्मीला प्रसन्न ठेवण्यासाठी आणि हसत खेळत घरामध्ये नांदण्यासाठी तिच्या पूजेचा खास थाट तुम्हाला करावा लागेल. चला तर पाहूया देवीच्या पूजेसाठी कोणकोणत्या गोष्टी कराव्या.

महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केवळ महालक्ष्मीचीच नाही तर लाडक्या गणरायाची पूजा देखील केली जाते. बाप्पांना आपण विघ्नहर्ता असं म्हणतो. त्यामुळे कोणतही शुभकार्य करताना प्रत्येकाच्या तोंडात गणपती बाप्पांचे नाव सर्वात आधी येतं. त्यामुळे महालक्ष्मीबरोबर गणपतीची आरती करणे देखील भाग्याचे मानले जाते.

देवीची थाटात पूजा विधी करण्यासाठी लागणारे साहित्य :
1. महालक्ष्मी आणि गणपती बाप्पांची नवीन मूर्ती किंवा त्यांचे फोटो.
2. वही किंवा चोपडी.
3. महालक्ष्मीच्या आसनासाठी एक लाल रंगाचे कापड
4. देवी महालक्ष्मीसाठी लाल रंगाचे आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र.
5. मूर्तीसाठी लाकडी स्टूल लागेल.
6. लाल मातीचे एकूण 25 दिवे.
7. मातीचे भांडे.
8. तुळशीची किंवा बिल्वची पाने.
9. ताज्या टवटवीत फुलांच्या तीन माळा.
10. माव्याची वेगवेगळ्या प्रकारची मिठाई, देठाची पानं, वेगवेगळ्या प्रकारची गोड फळ, उसाचा रस, दूर्वा, पंच, दक्षिणा, धूप, लोणी, गहू, पल्लव, बताशे, शाई, कापूर आणि जनेयू या सर्व साहित्यांची गरज तुम्हाला लागणार आहे.

अशी असावी साहित्याची मांडणी :
1. लक्ष्मीपूजनासाठी सर्वप्रथम एक चौरंग घ्यावा. चौरंग स्वच्छ करून त्यावर लाल रंगाचा चौकोनी कपडा अंथरावा. पुढे चौरंगावर अष्टदल कमल आणि स्वस्तिकाचे चिन्ह काढून घ्यावे. मार्केटमध्ये रेडीमेड चौरंग देखील उपलब्ध आहेत.

2. त्यानंतर तुम्हाला चांदी, माती किंवा तांब्याचे कलश घ्यायचे आहेत. त्या कलशात तुम्हाला गंगाजल मिसळून घ्यायचं आहे. त्यानंतर कलशामध्ये नारळ ठेवून आंब्यांची पाने बाजूने लावून घ्यायची आहेत.

3. आता तुम्हाला कलशाच्या डाव्या बाजूस पिवळ्या हळदीने कमलाचे फुल काढून घ्यायचे आहे आणि त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थानापन्न करायची आहे. त्यानंतर लक्ष्मीच्या समोर तुम्हाला सोन्याच्या किंवा चांदीचे नाणे ठेवायचे आहेत.

4. आता लक्ष्मीच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला गणरायांची स्थापना करून साहित्य संबंधित डायरी किंवा तुम्ही नवीन डायरी देखील ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला धूप आणि नैवेद्य अर्पण करून महालक्ष्मी समोर आणलेल्या सर्व साहित्य व्यवस्थितपणे मांडून देवीची पूजा करून घ्यायची आहे.

Latest Marathi News | Lakshmi Pujan 30 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Lakshmi Pujan(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x