5 December 2024 12:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY NTPC Green Share Price | मालामाल करणार NTPC ग्रीन शेअर, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - NSE: NTPCGREEN SIP Mutual Fund | ढीगभर पैसा जमा करायचा आहे मग, 'या' गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या नाहीतर सगळंच गमावून बसाल Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
x

शरद पवार यांनी मुंबईतील जे जे हॉस्पिटलमध्ये घेतली कोरोना लस

NCP, Sharad Pawar, JJ Hospital, corona vaccine

मुंबई, ०१ मार्च: महाराष्ट्रासह देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सोमवारपासून सुरू झाला आहे. यात 60 पेक्षा जास्त वय असलेले आणि 45 पेक्षा जास्त वय असलेल्या आजारी व्यक्तींना सामील करण्यात आले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी मुंबईतील जे.जे हॉस्पिटलमध्ये जाऊन कोरोना लस घेतली आहे. (NCP supremo Sharad Pawar has gone to JJ Hospital Mumbai for corona vaccine)

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवारांसोबत त्यांची मुलगी आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेदेखील होत्या. लसीकरणादरम्यान जे.जे. हॉस्पीटलचे डीन तात्याराव लहाणेदेखील पवारांसोबत उपस्थित होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पवारांनी भारत बायोटेकची Covaxin दिली आहे. (During vaccination, J.J. The dean of the hospital Tatyarao Lahane was also present with Sharad Pawar)

आज सकाळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील एम्समध्ये लस घेतली. दरम्यान, शरद पवार राज्यातील पहिले कोरोना लस घेणारे नेते बनले आहेत. देशात आजपासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. या टप्प्यात 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे. तसंच गंभीर आजारांशी लढा देणाऱ्या 45 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना करोना लस दिली जातेय. भारतात भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड या लसी देण्यात येत आहेत. मात्र कोणती लस कोणाला द्यायची याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची नियमावली ठरली आहे.

 

News English Summary: The second phase of corona vaccination across the country, including Maharashtra, has started from Monday. This includes sick people over the age of 60 and those over the age of 45. Meanwhile, NCP supremo Sharad Pawar has gone to JJ Hospital in Mumbai and got corona vaccine.

News English Title: NCP supremo Sharad Pawar has gone to JJ Hospital Mumbai for corona vaccine news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x