23 April 2024 7:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 23 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 23 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Patel Engineering Share Price | दिग्गज गुंतवणुकदारांनी खरेदी केला हा स्वस्त शेअर, स्टॉक पुढे मोठी कमाई करून देणार Swadha Nature Share Price | शेअरची किंमत 8 रुपये! अवघ्या 2 दिवसात दिला 40 टक्के परतावा, रॉकेट तेजीत कमाई BEL Share Price | PSU शेअर पुढेही मालामाल करणार, यापूर्वी 15,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर दिला 1.58 कोटी रुपये परतावा Infosys Share Price | इन्फोसिस शेअर मालामाल करणार! तज्ज्ञांकडून स्टॉकवर 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राईस केली जाहीर
x

येडियुरप्पा सरकारकडून पाटबंधारे विभागात २१,४७३ कोटीचा घोटाळा | भाजप नेत्याकडून आरोप

BJP MLA Vishwanath

बंगळुरू, १८ जून | भाजपाच्या कर्नाटकमधील सरकारच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कारण आता आरोप विरोधक नव्हे तर थेट भाजपमधीलच महत्वाचे नेते करू लागले आहेत. अनेक आमदार आणि मंत्री सध्या मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांना पदावरून हटवण्याची मागणी करत आहेत. परिणामी दिल्लीतील भाजप वरिष्ठांच्या देखील अडचणीत वाढ होणार आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांना पदावरून हटवण्याची मागणी करणारे भाजपाचे एएच विश्वनाथ यांनी त्यांच्याच सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप लावला आहे. पाटबंधारे विभागाने आर्थिक मंजुरी न घेता घाईत २१,४७३ कोटी रुपयांचा निविदा काढल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच यामध्ये घोटाळा झाला असल्याचा देखील विश्वनाथ म्हणाले. एएच विश्वनाथ हे विधान परिषद सदस्य आहेत.

विश्वनाथ यांनी येडियुरप्पा यांचा मुलगा आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी वाय. विजयेंद्र यांनी सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला. विश्वनाथ पत्रकार परिषदेत म्हणाले, “भद्रा अप्पर कालवा प्रकल्प व कावेरी पाटबंधारे प्रकल्पांशी संबंधित पाटबंधारे विभागात २० हजार कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे कंत्राट तयार केले गेले आहे. वित्त विभागाकडून कोणतीही आर्थिक मंजुरी घेण्यात आली नाही, मंडळाची बैठक घेण्यात आली नाही. हे घाईघाईने केले गेले” असं ते म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: BJP MLA Vishwanath Alleges rupees 21473 Crore Tender Scam news updates.

हॅशटॅग्स

#Karnataka(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x