13 December 2024 8:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
x

IPO Ami Organics Limited | या IPO'मुळे 3 दिवसात गुंतवणूकदारांचे पैसे डबल

IPO AMI Organics Limited

मुंबई, १७ सप्टेंबर | मागील काही महिन्यांपासून अनेक आयपीओ बाजारात आले आहेत. यापैकी महत्त्वाच्या IPOs नी गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न दिला आहे. यापैकी एक आहे एमी ऑर्गेनिक्स. केवळ तीन दिवसात या आयपीओने ग्राहकांना डबल रिटर्न दिला आहे. कंपनीने आयपीओसाठी प्राइस बँड 610 रुपये निश्चित केला होता. दरम्यान आता शेअरची किंमती इश्यू प्राइसपेक्षा दुप्पट झाली आहे. आज या कंपनीचा शेअर 1280 रुपयांवर बंद झाला आहे. अर्थात जर तुम्ही हा आयपीओ इश्यू झाल्यावर त्यात गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला 100 टक्के पेक्षा जास्त रिटर्न अवघ्या तीन दिवसात मिळाला आहे. बीएसईवर (BSE) या शेअरची किंमत 1346 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचली होती.

IPO Ami Organics Limited, या IPO’मुळे 3 दिवसात गुंतवणूकदारांचे पैसे डबल – IPO of AMI Organics Limited made investors money double in 3 days :

14 सप्टेंबर रोजी कंपनीचा शेअर 48 टक्के प्रीमियमसह 902 रुपयांवर BSE वर लिस्ट झाला होता. आज इश्यू प्राइसपेक्षा शेअरची किंमत 736 रुपयांपेक्षा जास्त आहे. ही किंमत 121 टक्क्यांनी जास्त आहे. आज शेअरची किंमत 1346 रुपयांवर पोहोचली आहे. एमी ऑर्गेनिक्सचा आयपीओला 65 टक्के सब्सक्राइब करण्यात आले आहे. एमी ऑर्गेनिक्सच्या आयपीओसाठी शेअरची किंमत 603-610 रुपये होती. त्याच वेळी, एक लॉट 24 शेअर्सचा होता.

Ami Organics’ Rs 570 crore IPO kicks off :

मागील 5 ते 10 वर्षांबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीची वाढ प्रभावी आहे. कंपनीवर 135 कोटी रुपयांचे कर्ज आहे, जे आयपीओच्या उत्पन्नातून फेडले जाईल. Ami Organics चा सर्वात जास्त महसूल अॅक्टिव्ह फार्मा इनग्रेडिएंट्स (एपीआय)मध्ये वापरल्या जाणाऱ्या फार्मा इंटरमीडिएट्सच्या विक्रीतून येतो. कंपनी अँटी-सायकोटिक, अँटी-रेट्रोव्हायरल, अँटी-डिप्रेसेंट, अँटी-इनफ्लेमेटरीशी संबंधित फार्मा इंटरमीडिएट्सची विक्री करते. अलीकडेच एमी ऑर्गेनिक्सने गुजरात ऑर्गेनिक्सचे दोन उत्पादन प्रकल्पांचे अधिग्रहण केले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: IPO of AMI Organics Limited made investors money double in 3 days.

हॅशटॅग्स

#BSE(24)#IPO(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x