18 May 2024 10:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा
x

Title Insurance for Property | मालमत्ता खरेदीतील फसवणूक टाळण्यासाठी विमा कंपन्या आणणार योजना

Title Insurance for Property

मुंबई, १७ सप्टेंबर | खोटी कागदपत्रं वापरून एकच घर अनेक जणांना विकल्याच्या किंवा परस्पर दुसऱ्याची मालमत्ता विकून फसवणूक केल्याच्या बातम्या अनेकदा आपण ऐकतो. अनेकदा मालमत्तेचा खरा मालक कोण याची माहिती मिळत नाही. अशा वेळी न्यायालय ती मालमत्ता बेकायदेशीर असल्याचं घोषित करतं. व्यवहार करतानाही अडचणी येतात; मात्र आता या सगळ्या अडचणींवर मात करता येणार आहे. कारण लवकरच विमा कंपन्या टायटल इन्शुरन्स (Title Insurance) ही मालमत्ता मालकी हक्काबाबतची पॉलिसी दाखल करणार आहेत.

Title Insurance for Property, मालमत्ता खरेदीतील फसवणूक टाळण्यासाठी विमा कंपन्या आणणार योजना – Title Insurance for Property much needed relief for home buyers :

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात ‘इर्डा’ने (आयआरडीएआय -IRDAI) आरोग्य विमा कंपन्या वगळता इतर विमा कंपन्यांना टायटल इन्शुरन्स योजना उपलब्ध करण्यास सांगितलं आहे. यामुळे मालमत्ता खरेदी करणाऱ्या व्यक्तींची खोट्या कागदपत्रांच्या सहाय्यानं केली जाणारी फसवणूक टाळता येणं शक्य होणार आहे. टायटल इन्शुरन्स योजनेमुळे मालमत्तेच्या मालकी हक्कातल्या घोटाळ्यामुळे होणाऱ्या फसवणुकीपासून ग्राहकांना संरक्षण मिळतं.

नुकसानभरपाई विम्याचाच हा एक प्रकार आहे. मालमत्तेच्या मालकी हक्काबाबत चुकीचं नाव असल्यानं किंवा अन्य काही घोटाळ्यामुळे, तसंच चुकीच्या कंपन्या किंवा वैयक्तिक पातळीवर होणाऱ्या आर्थिक नुकसानाची भरपाई देण्याची तरतूद या योजनेत असावी, अशी सूचना ‘इर्डा’ने केली आहे.

आपल्या देशात अशा प्रकारच्या विमा योजना अत्यंत प्राथमिक अवस्थेत असून, सध्या त्या फक्त विकासक, बांधकाम व्यावसायिक यांच्यासाठीच उपलब्ध आहेत. सर्वसामान्य नागरिकांना याबाबत फारशी माहितीदेखील नाही. ‘इर्डा’ने याला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतल्यानं आता सर्वासामान्य नागरिकांनाही ही विमा योजना उपलब्ध होईल आणि त्याचा प्रसारही वाढेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Title Insurance for Property much needed relief for home buyers.

हॅशटॅग्स

#InsuranceCompanies(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x