
PSU Stocks | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या डिफेन्स स्टॉकमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. भारत सरकारने आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत देशातील संरक्षण क्षेत्राच्या स्वावलंबनावर अधिक भरा दिला आहे. त्यामुळे आता भारतीय संरक्षण क्षेत्राने विविध देशांना आपली उत्पादने निर्यात करायला सुरुवात केली आहे.
पुढील काळात भारतीय डिफेन्स सेक्टरमध्ये आणखी वाढ पाहायला मिळू शकते. म्हणून शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी चार मजबूत डिफेन्स स्टॉक निवडले आहेत, जे पुढील काळात गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकबद्दल सविस्तर माहिती.
बीईएल :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 33 टक्के परतावा कमावून देऊ शकतात. नुकताच या कंपनीला भारतीय लष्कराने 580 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली होती. 17 जानेवारी 2014 रोजी या कंपनीचे शेअर्स 10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या नीचांक किंमतीवरून हा स्टॉक 1500 टक्के वाढला आहे. आज शुक्रवार दिनांक 17 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.52 टक्के वाढीसह 248.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
माझगाव डॉक शिपबिल्डर :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 32 टक्के परतावा कमावून देऊ शकतात. आज शुक्रवार दिनांक 17 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 14 टक्के वाढीसह 2,781.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 21 टक्के परतावा कमावून देऊ शकतात. आज शुक्रवार दिनांक 17 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.61 टक्के घसरणीसह 4529.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
भारत डायनॅमिक्स :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 12 टक्के परतावा कमावून देऊ शकतात. आज शुक्रवार दिनांक 17 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 11.42 टक्के वाढीसह 2,305.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.