12 December 2024 8:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Ashok Leyland Share Price | मार्ग श्रीमंतीचा! भरवशाच्या अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजीचे संकेत, 'या' बातमीने मजबूत परतावा मिळणार

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीच्या संचालक मंडळाने 1200 कोटी रुपयेची गुंतवणूक योजना जाहीर केली आहे. अशोक लेलँड कंपनी ही रक्कम भांडवली खर्च, कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहन युनिटचे संशोधन आणि विकास, भारत आणि ब्रिटनमधील व्यवसायाचा खर्च यासाठी खर्च केली जाणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही रक्कम पुढील काही महिन्यांत गुंतवणूक करून निर्धारित कामासाठी खर्च केली जाईल.

कंपनीच्या संचालकांनी म्हंटले आहे की, ही रक्कम टप्प्याटप्प्याने खर्च करण्याची योजना आखण्यात आली आहे. आज सोमवार दिनांक 13 नोव्हेंबर 2023 रोजी अशोक लेलँड स्टॉक 1.53 टक्के घसरणीसह 173.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अशोक लेलँड कंपनीने आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच स्विच मोबिलिटी कंपनीमध्ये 1200 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची योजना जाहीर केली आहे. ही गुंतवणूक Optare PLC UK या होल्डिंग कंपनीच्या माध्यमातून केली जाणार आहे. अशोक लेलँड कंपनी ही रक्कम भांडवली खर्च, संशोधन आणि विकास व आपल्या व्यावसायिक गरजांची पूर्तता करण्याचे ठरवले आहे.

कंपनीने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, इलेक्ट्रिक वाहने, बस आणि लहान ट्रक हे वाहतूक क्षेत्रातील कणा मानला जातो. भारत सरकार आणि खाजगी क्षेत्र आता हरित ऊर्जा क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. अशोक लेलँड कंपनीने स्विच मोबिलिटी यूके शाखेने नवीन बस लाँच केली आहे, जी यूकेच्या गरजा विचारात घेऊन बनवण्यात आली आहे.

अशोक लेलँड कंपनीने 9 नोव्हेंबर 2023 रोजी आपले सप्टेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. या तिमाहीत कंपनीने 561 कोटी रुपये नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या तिमाहीत कंपनीचा नफा 181 टक्के वाढला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीचे महसूल 16.6 टक्क्यांच्या वाढीसह 9638 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. अशोक लेलँड कंपनीचा EBITDA 1080 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स 1.8 टक्क्यांच्या घसरणीसह 170 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील तीन महिन्यांपासून अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड कर आहेत. ऑगस्ट 2023 मध्ये या कंपनीचे शेअर्स 190 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashok Leyland Share Price NSE 13 November 2023.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(66)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x