6 May 2024 11:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

AkashDeep Metal Share Price | या कंपनीचे शेअर्स स्प्लिट झाले, शेअरची किंमत 5 पट स्वस्त झाली, स्वस्तात खरेदी करणार?

AkashDeep Metal Share Price

AkashDeep Metal Share Price | ‘आकाशदीप मेटल्स’ कंपनीचे शेअर्स 23 फेब्रुवारी 2023 रोजी एक्स स्प्लिट म्हणून करत होते. तर शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.03 टक्के घसरणीसह 17.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. स्टॉक स्प्लिट होण्यापूर्वी गुंतवणूकदार आकाशदीप मेटल कंपनीच्या शेअरमध्ये प्रचंड रस दाखवत होते. मात्र शेअरची किंमत पाच पट कमी झाली आहे, आणि स्टॉक अजून स्वस्त झाला आहे. चला जाणून घेऊ हा स्टॉक खरेदी केल्यास फायदा होईल की नाही? (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Akashdeep Metal Industries Share Price | Akashdeep Metal Industries Stock Price | BSE 538778)

‘आकाशदीप मेटल्स’ या स्मॉल कॅप कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, कंपनीच्या संचालकांनी शेअर्स 5 तुकड्यांमध्ये विभाजित करण्याची घोषणा केली आहे. स्टॉक स्प्लिटनंतर कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपयांवरून 2 रुपयांवर येईल. 23 फेब्रुवारी 2023 हा दिवस कंपनीने स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केला होता. म्हणजे या तारखे पर्यंत ज्या लोकांचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये राहील, त्यांना स्टॉक स्प्लिटचा फायदा होईल.

मागील काही दिवस शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी निराशाजनक राहिले आहे. ‘आकाशदीप मेटल’ कंपनीचे शेअर्स मागील 5 दिवसांत 13.66 टक्क्यांहून अधिक कमजोर झाले आहेत. त्याचवेळी ज्या गुंतवणूकदारांनी एक वर्षभरापूर्वी या कंपनीच्या शेअर्सवर पैसे लावले होते, त्यांनी आतापर्यंत 103 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 34.90 रुपये होती. तर आणि 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 6.66 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Akashdeep Metal Industries Share Price 538778 stock market live on 24 February 2023.

हॅशटॅग्स

AkashDeep Metal Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x