19 May 2024 4:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील
x

Voltas Share Price | टाटा ग्रुपचा हा मल्टिबॅगर शेअर निम्म्याने स्वस्त झालाय, स्टॉक खरेदी करावा? तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला

Voltas Share Price

Voltas Share Price | भारतात अजून हिवाळा नीट संपला नाही, तर कडक उन्हाळा सुरू झाला आहे. शेअर बाजारात जसा गोंधळ निर्माण झाला आहे, तसाच काहीसा गोंधळ वातरणानाने देखील निर्माण केला आहे. कोणाला काहीच समजत नाहीये, नेमकं चाललंय काय? एक गोष्ट मात्र नक्की आहे की तुम्ही यावर्षीच्या गर्मीत ‘एअर कंडीशनर’ खरेदी करण्याचा विचार तर शंभर टक्के करणार. फेब्रुवारीमध्ये अचानक जाणवू लागलेल्या तापमानवाढीमुळे आणि हवामान खात्याच्या अंदाजामुळे टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘व्होल्टास’ कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे, त्यामुळे वाढत्या उष्णतेपासून हाल होऊ नये म्हणून लोकांनी एसी खरेदी करायला सुरुवात केली आहे. याचा फायदा टाटा समूहातील ‘व्होल्टास’ कंपनीला होत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Voltas Share Price | Voltas Stock Price | BSE 500575 | NSE VOLTAS)

ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेफरीजने ‘व्होल्टास’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. ब्रोकरेज हाऊसच्या म्हणण्यानुसार, अचानक वाढलेल्या उन्हाळ्यामुळे एसीच्या विक्रीत जबरदस्त तेजी आली आहे, आणि पुढील काही महिन्यांत एसी शिवाय लोकांची अवस्था घामाघूम होणार आहे. त्याचा थेट फायदा व्होल्टास कंपनीला मिळणार आहे. जेफरीज फर्मने व्होल्टास कंपनीच्या स्टॉकवर प्रति शेअर 1,050 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.67 टक्के घसरणीसह 894.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

कंपनीचे तिमाही निकाल :
‘व्होल्टास’ कंपनीला ऑक्टोबर-डिसेंबर 2022 या तिमाहीत 110.5 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत व्होल्टास कंपनीने 96 कोटी रुपये निव्वळ नफा कमवला होता. जेफरीज फर्मच्या म्हणण्यानुसार व्होल्टास कंपनीची कामगिरी फारशी संतुष्ट करणारी नाही आणि मागील एका वर्षात हा स्टॉक 27 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. तरीही पुढील काळात हा स्टॉक 1,300 रुपयांवर जाऊ शकतो असे तज्ञ म्हणतात.

ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, व्होल्टास कंपनीच्या एकूण सेल्सपैकी 40 टक्के विक्री उत्तर भारतातून आणि 20-25 टक्के पश्चिम भागातून होते. एसीच्या वाढत्या मागणीचा थेट फायदा या कंपनीला होणार आहे. मार्च 2022 च्या 19 टक्क्यांच्या एक्झिट रन रेटवरून व्होल्टास कंपनीने आपला बिजनेस मार्केट 23-24 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Voltas Share Price 500575 stock market live on 24 February 2023.

हॅशटॅग्स

#Voltas Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x