
IPO GMP | एनर्जी मिशन मशिनरी या स्मॉल कॅप कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. एनर्जी मिशन मशिनरीचा आयपीओ पहिल्याच दिवशी फुल्ल सबस्क्राईब झाला आहे. या कंपनीचा IPO 9 मे रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला होता. पहिल्याच दिवशी या IPO ला 7 पट अधिक बोली मिळाली आहे. एनर्जी मिशन मशिनरी कंपनीचा IPO 13 मे 2024 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. या कंपनीच्या IPO चा एकूण आकार 41.15 कोटी रुपये आहे. ( एनर्जी मिशन मशिनरीज कंपनी अंश )
एनर्जी मिशन मशिनरी कंपनीचे शेअर्स 275 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. या कंपनीच्या IPO शेअर्सची किंमत बँड 138 रुपये होती. सध्या ग्रे मार्केटमध्ये हा स्टॉक 140 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच हा स्टॉक 275 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो.
ज्या गुंतवणूकदारांना IPO मध्ये या कंपनीचे शेअर्स वाटप केले जातील, त्यांना लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 100 टक्क्यांपेक्षा जास्त नफा मिळू शकतो. या कंपनीचे शेअर्स 14 मे रोजी वाटप केले जातील. आणि गुरुवार दिनांक 16 मे 2024 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील.
एनर्जी मिशन मशिनरी कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या SME प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केले जाणार आहेत. या कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 10.79 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणीचा राखीव कोटा 4.90 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे.
क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा राखीव कोटा 2.51 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदार IPO मध्ये 1 लॉट अंतर्गत 1000 शेअर्स खरेदी करू शकतात. एक लॉट खरेदी करण्यासाठी किरकोळ गुंतवणूकदारांना किमान 1.38 लाख रुपये जमा करावे लागतील.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.