24 October 2024 10:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | कंपनी ऑर्डरबुक मजबूत होऊनही शेअर घसरतोय, पुढे रॉकेट तेजी, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: NBCC NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत मोठी अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BHEL NHPC Share Price | NHPC शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर 'ओव्हरसोल्ड' झोनमध्ये, स्टॉक बाऊन्स बॅक करणार, कमाईची संधी - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉकबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, स्टॉक 'BUY' करावा की 'Sell'?

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स मजबूत वाढू शकतात, असे संकेत मिळत आहेत. नुकताच टाटा मोटर्स कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाने निव्वळ कर्जमुक्त होण्याची योजना जाहीर केली होती. यासह कंपनीने प्रवासी वाहन आणि व्यावसायिक वाहन विभाग डिमर्जर करण्याची घोषणा केली होती. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )

तसेच टाटा मोटर्स कंपनीने पुढील 2 वर्षांमध्ये विविध वाहनांचे 5-6 नवीन मॉडेल्स लॉन्च करण्याची योजना आखली आहे. आज गुरूवार दिनांक 13 जून 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 0.35 टक्के घसरणीसह 985.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

टाटा मोटर्स कंपनी पुढील 6 वर्षांत EV व्यवसायात 16,000-18,000 कोटी रुपये गुंतवणूक करू शकते. जेएम फायनान्शियल फर्मच्या मते, टाटा मोटर्स कंपनीने 2025-26 पर्यंत कंपनीच्या PV विभागामध्ये 200 बेसिस पॉइंट्स मार्केट शेअर वाढ करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. CV व्यवसायाच्या संदर्भात 2024-25 मध्ये कंपनीचा मार्केट शेअर सिंगल नंबरने वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे शेअर बाजारातील तज्ञांनी या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन 1,200 रुपये टार्गेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

बुधवारी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 2.31 टक्क्यांच्या वाढीसह 987.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3.35 लाख कोटी रुपये आहे. कोविड-19 काळात या कंपनीचे शेअर्स 65 रुपये किमतीवर आले होते. त्यानंतर हा स्टॉक 1,450 टक्के वाढून सध्याच्या किमतीवर पोहचला आहे. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 80 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस फर्मच्या मते, टाटा मोटर्स स्टॉक 955 रुपये किमतीवर येऊ शकतो. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार रेखा राकेश झुनझुनवाला यांनी 31 मार्च 2024 पर्यंत टाटा मोटर्स कंपनीचे 4,28,00,000 इक्विटी शेअर्स म्हणजेच 1.28 टक्के भाग भांडवल धारण केले होते. त्यांच्या एकूण गुंतवणुकीचे मूल्य सध्या 4,322.80 कोटी रुपये आहे.

नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मच्या मते, टाटा मोटर्स स्टॉकचा एबिटा आर्थिक वर्ष 2024-26 मध्ये 2021-24 च्या तुलनेत अनुक्रमे 9 टक्के आणि 13 टक्के राहण्याचा अंदाज आहे. आणि कंपनीची महसूल वाढ याच काळात अनुक्रमे 21 टक्के आणि 25 टक्के राहण्याची शक्यता आहे. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मच्या मते, टाटा मोटर्स स्टॉक पुढील काळात 940 रुपये किमतीवर येऊ शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Motors Share Price NSE Live 13 June 2024.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(133)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x