19 July 2024 2:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | आता नाही थांबणार! अशोक लेलँड शेअर मजबूत परतावा देणार, फायद्याची अपडेट आली Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग सह या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची मोठी संधी IFL Enterprises Share Price | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, शॉर्ट टर्म मध्ये मालामाल करतोय शेअर Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Rites Share Price | पटापट खरेदी करा हा मल्टिबॅगर शेअर, कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, पुन्हा तेजी येणार IREDA Share Price | PSU शेअरने भरपूर कमाई झाली, आता सावध होण्याचा सल्ला, किती घसरणार स्टॉक प्राईस? KPI Green Energy Share Price | मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदीची संधी, यापूर्वी 5 पटीने वाढवला पैसा
x

Reliance Infra Share Price | स्टॉक रॉकेट स्पीडमध्ये परतावा देणार, 5 दिवसात दिला 30% परतावा, खरेदीला गर्दी

Reliance Infra share price

Reliance Infra Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी इंडेक्स 58 अंकांच्या वाढीसह 23323 अंकावर क्लोज झाला होता. तर सेन्सेक्स इंडेक्स 150 अंकांच्या वाढीसह 76607 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. अशा काळात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे शेअर्स मजबूत कामगिरी करत आहेत. ( रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी अंश )

आज या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. तर बुधवारी रिलायन्स इन्फ्रा स्टॉक 1 टक्क्यांच्या वाढीसह क्लोज झाला होता. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 30 टक्क्यांनी वाढले आहेत. आज गुरूवार दिनांक 13 जून 2024 रोजी रिलायन्स इन्फ्रा स्टॉक 4.42 टक्के वाढीसह 198.71 रुपये किमतींवर ट्रेड करत आहेत.

बुधवारी दिवसभराच्या ट्रेडिंगमध्ये रिलायन्स इन्फ्रा स्टॉक 3.50 टक्क्यांच्या वाढीसह 196.50 रुपये किमतीवर पोहचला होता. रिलायन्स-इन्फ्रा ही कंपनी मुख्यतः ऊर्जा, रस्ते, मेट्रो रेल्वे आणि विमानतळ आणि इन्फ्रा क्षेत्रात व्यवसाय करते. मागील 5 दिवसात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे.

रिलायन्स व्हेलॉसिटी कंपनीने 6 जून 2024 रोजी रिलायन्स EV Pvt कंपनीची नोंदणी केली आहे. RVL कंपनीने REVPL कंपनीचे अधिकृत आणि पेड-अप शेअर कॅपिटल 100000 रुपये ठेवले आहे. यामधे 10 रुपये दर्शनी मूल्याचे 10,000 इक्विटी शेअर्स असतील.

रिलायन्स इन्फ्रा कंपनीने आपले कर्ज परतफेड करण्यासाठी आणि वीज निर्मितीसारखे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी परकीय परिवर्तनीय चलन रोख्याच्या माध्यमातून 350 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 3,000 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याची योजना आखली आहे. रिलायन्स इन्फ्रा कंपनीने रस्ते बांधणी, मेट्रो रेल्वे आणि वीजनिर्मिती व्यवसाय करणाऱ्या चार कंपन्या स्थापन करण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 7,712.67 कोटी रुपये आहे.

मागील एका महिन्यात रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 19.54 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 10.54 टक्क्यांनी घसरली आहे. 2024 या वर्षात रिलायन्स इन्फ्रा स्टॉक 7.5 टक्के घसरला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने लोकांना 39.73 टक्के, मागील दोन वर्षात 88.44 टक्के, आणि मागील तीन वर्षात 134 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षात रिलायन्स इन्फ्रा स्टॉक 203.74 टक्क्यांनी मजबूत झाला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Infra Share Price NSE Live 13 June 2024.

हॅशटॅग्स

Reliance Infra Share Price(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x