
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या अक्षय ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीने बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात मोठी भर पडली आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट खरेदी पाहायला मिळत आहे.
डिसेंबर तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने मागील वर्षीच्या डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत 160 टक्क्यांच्या वाढीसह 203.04 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील डिसेंबर तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने 78.28 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मजबूत तिमाही निकलाच्या पार्श्वभूमीवर सजलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. आज गुरूवार दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.90 टक्के वाढीसह 48.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 46.01 रुपये होती. सेबीला दिलेल्या माहितीत सुझलॉन एनर्जी कंपनीने कळवले आहे की, डिसेंबर तिमाहीत कंपनीने 1,569.71 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. डिसेंबर 2022 तिमाहीत या कंपनीने 1,464.15 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
सुझलॉन समूहाच्या उपाध्यक्षानी एका निवेदनात म्हंटले आहे की, “आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने मजबूत कामगिरी केली आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना सुधारित ग्राहक अनुभव प्रदान करण्यासाठी उत्सुक आहे. मजबूत संस्था आणि व्यवस्थापन संरचना तयार करण्याच्या दिशेने कंपनी आपल्या सर्व प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करत आहे”.
मागील काही महिन्यापासून सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 44.90 रुपये या आपल्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच सुझलॉन एनर्जी कंपनीला, एव्हरेन कंपनी, एबीसी क्लीनटेक प्रायव्हेट लिमिटेडकडून 1642 मेगावॅट क्षमतेचे पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे कंत्राट मिळाले आहे. एव्हरेन ही कंपनी भारतातील ब्रुकफील्ड आणि ॲक्सिस एनर्जी कंपनीने स्थापन केलेला संयुक्त उपक्रम आहे.
मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 140 टक्के परतावा कमावून दिला आहे. याकाळात कंपनीच्या शेअर्सची किंमत 19 रुपयेवरून वाढून सध्याच्या किंमतीवर पोहोचली आहे.
मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 400 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात शेअर्सची किंमत 9 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहोचली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 6.96 रुपये होती. मागील पाच वर्षांत सुझलॉन एनर्जी स्टॉक तब्बल 1000 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 62,472.78 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.