26 July 2021 12:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

मराठा नंतर OBC'वरही भाजपचं अजब राजकारण | केंद्राकडे इम्पिरिकल डेटा उपलब्ध असताना राज्याकडे मागणी

OBC Reservation

मुंबई, १८ जून | मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणावरुन राजकारण तापलेले असल्याचे पहायला मिळत होते. आता यानंतर राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या आरक्षणासंदर्भात राज्यातील ओबीसी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. यासंदर्भात भाजपची बैठक झाली. या बैठकीनंतर येत्या 26 जून रोजी ओबीसी आरक्षणासाठी राज्यात एक हजार ठिकाणी चक्काजाम आंदोलन केले जाणार असल्याची घोषणा पंकजा मुंडेंनी केली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

ओबीसी आरक्षणासंदर्भात आज भाजपची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईत पत्रकारपरिषद घेत येत्या 26 जूनपासून आंदोलन केले जाणार असल्याची माहिती दिली. तसेच महाविकास आघाडीच्या चुकीमुळे ओबीसींचे आरक्षण गेले आहे. राज्य सरकारने ओबीसींचे राजकारण संपवले असल्याचेही पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यामुळेच या सरकारला धडा शिकवण्यासाठी आम्ही येत्या 26 जून रोजी चक्काजाम आंदोलन करणार असल्याची माहिती पंकजा मुंडे म्हणाल्या.

यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ‘पंकजा मुंडेंनी सांगितलेलं खरे आहे, आज आम्ही सर्व ओबीसी नेते या निकषावर आलो आहोत, की या महाराष्ट्र सरकारला ओबीसींचे आरक्षण द्यायचे नाही. यामुळेच 26 जून रोजी महाराष्ट्रामध्ये एक हजार ठिकाणी भाजपकडून आंदोलने केली जाणार आहे. गरज पडली तर आम्ही सर्वजण पुन्हा न्यायालयात जाऊन तसेच या सरकारला ओबीसी आरक्षण देण्यासाठी भाग पाडू असेही ते म्हणाले आहेत. तसेच या सरकारने ओबीसींवर अन्याय केलेला आहे. आता हे सरकार नौटंकी करत आहेत. या सर्वाचा आम्ही निषेध करतो. आम्ही रस्त्यावर उतरू, न्यायालयात जाऊ पण ओबीसी आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, केंद्राकडून ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळवण्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. कारण, केंद्राकडे असलेला हा डेटा मिळाला तर ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल”, असे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट म्हटले आहे. तसेच हा मिळावा म्हणून आम्ही केंद्राला दोन पत्रे लिहिली पण डेटा मिळाला नाही. मुख्यमंत्र्यांनीही याबाबत पंतप्रधानांना विनंती केली आहे, असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, ओबीसी आरक्षणासाठी महत्त्वाचा असलेला इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे काम आयोगाला देण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी कोरोना काळात हा डेटा गोळा करणे कठिण आहे. त्यामुळे केंद्राकडे असलेला हा डेटा मिळावा म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विजय वडेट्टीवार यांनी लोणावळ्यात एका चिंतन शिबीराचे देखील आयोजन केले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: BJP leader Pankaja Munde aggressive over OBC Reservation Issue news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(647)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x