12 December 2024 5:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON
x

मनसेने अवाजवी वीज बिलं माफ करण्याची मागणी केंद्राकडे करावी - ऊर्जामंत्री नितीन राऊत

MNS, Electricity Bills, Raj Thackeray, Minister Nitin Raut

मुंबई, ११ ऑगस्ट : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळानंतर महावितरण आणि इतरही काही वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून ग्राहकांना भरमसाट वीज बिलं देण्यात आली. यासंदर्भात सध्या बरीच नाराजी दिसून येत आहे. पण, वीज बिलांची तपासणी केल्यास मुळात वीज बिलांच्या देय रकमेचा आकडा वाढवलेला नाही, असं मत खुद्द राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी मांडलं आहे.

वीज बिलं वाढल्याचा समज असला तरीही मुळात मात्र ती वाढलेली नाहीत, याच मतावर ते ठाम दिसले. नवी मुंबई येथे मनसे कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कार्यालयात तोडफोड केल्याच्याच्या घटनेबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ग्राहकांची अवाजवी वीज बिलं माफ करावी अशी मनसेची मागणी आहे, त्यांनी केंद्र सरकाकडे ही मागणी करावी असं त्यांनी थेट शब्दांत सांगितलं. आमच्यावर लावला जाणारा आक्षेप चुकीचा आहे असं म्हणत घरगुती ग्राहकांची आर्थिक स्थिती नाजूक आहे, त्यामुळे त्यांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याची बाब राऊत यांनी अधोरेखित केली.

महावितरणच्या वाढीव वीज बिलाचा फटका सर्वसामान्यांसह दिग्गज लोकांना देखील बसला आहे. अगदी भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही फटका बसला होता. मुक्ताईनगर येथील त्यांच्या राहत्या घराचे बिल एक लाखाहून अधिक रकमेचे आल्याने त्यांनी आपला संताप व्यक्त केला होता. महावितरणने सर्व सामान्य जनतेला वेठीस धरू नये, बिलांमध्ये सूट द्यावी, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली होती.

तत्पूर्वी वीज बिलामध्ये काहीतरी सवलती द्या. नागरिकांना वेठीस धरु नका, अशी निवेदनं मनसेने सुद्धा महावितरण आणि खाजगी वीज वितरक कंपन्यांना दिली होती. लॉकडाउनच्या काळात आलेल्या भरमसाठ वीज बिलांमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहे. वीज बिल कमी करावे, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबद्दल राज्य सरकारला पत्र लिहिले होते. त्यानंतर आता मनसे कार्यकर्त्यांनी आपल्या स्टाईलने आंदोलन सुरू केले आहे.

नवी मुंबई आज सकाळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे. वाशी सेक्टर १७ मधील महावितरणच्या कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. कार्यालयाच्या काचा आणि फर्निचरची कार्यकर्त्यांनी तोडफोड करून वीज बिल दरवाढीचा निषेध केला आहे.

दरम्यान, नवी मुंबईत वाशी सेक्टर १७ मधील MSEB कार्यालय तोडफोड प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाढीव वीज बिलाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले होते. विद्युत बिलाबाबत लक्ष घालून नागरिकांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी केली होती. जर नागरिकांना दिलासा न मिळाल्यास मनसे गप्प बसणार नाही, असाही इशारा यावेळी देण्यात आला होता. त्यानंतर नागपूर येथे आंदोलन करण्यात आले होते. आता नवी मुंबईत खळ्ळखट्याक करण्यात आले.

 

News English Summary: The MNS has demanded that the exorbitant electricity bills of the consumers be waived. He said that they should make this demand to the Central Government. The financial position of domestic consumers is fragile, saying that the allegations against us are wrong News Latest Updates.

News English Title: MNS Party activists arrested by Vashi Police in Navi Mumbai News Latest Updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x