4 October 2023 9:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Vs Jupiter Wagons Share | बापरे! ज्युपिटर वॅगन्स शेअरने 3 वर्षात 4300 टक्के परतावा दिला, अक्षरशः पैशाचा पाऊस पडतोय हा शेअर Multibagger Stocks | सदर्न मॅग्नेशियम अँड केमिकल्स शेअरने अल्पावधीत 124% परतावा दिला, मजबूत कमाई करण्याची संधी Quick Money Shares | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अवघ्या एका महिन्यात 150 टक्के पर्यंत परतावा देत आहेत, फायदा घेणार? Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 04 ऑक्टोबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत मोठे अपडेट, इंडेक्स नंबर घसरल्याने आता DA किती वाढणार? Stocks in Focus | एका आठवड्यात 53 टक्के पर्यंत परतावा देणारे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट पैसे गुणाकारात वाढवतील BOI Net Banking | सरकारी बँक ऑफ इंडियाच्या FD योजनेवरील व्याजदरात वाढ, गुंतवणूकदारांना मिळणार इतकं अधिक व्याज
x

खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची लुटमार | ठाकरे सरकार लूटमार रोखण्यात असमर्थ

Thackeray Government, Devendra Fadnavis, Corona Crisis

मुंबई, ११ ऑगस्ट : एकाबाजूला राज्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या समस्या दिवसांगणिक वाढतच असताना राज्य सरकार कोणतेही निर्णय घेण्यास तयार नाही. केवळ चालढकलीचे धोरण त्यांनी अवलंबिले आहे. या कठीण परिस्थितीत भाजपा-महायुती पूर्ण ताकदीनिशी दूध उत्पादकांच्या पाठिशी असून त्यांना न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही, असा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

असाच प्रश्न आमच्या सरकारच्या काळात आला तेव्हा दूधसंघांना प्रतिलिटर दूधखरेदीसाठी अनुदान देण्यात आले होते. दूध भुकटी निर्यातीसाठी तसेच दूध निर्यातीसाठी सुद्धा भरीव अनुदान देण्यात आले होते.दूध उत्पादकांचा लढा आता निर्णायक टप्प्यात नेला जाईल. पक्षातर्फे रितसर आंदोलनाची घोषणा केली जाईलच. या कठीण प्रसंगी दूध उत्पादकांच्या पाठिशी आम्ही ठामपणे उभे आहोत. ही लढाई संपेस्तोवर भाजप स्वस्थ बसणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दुसरीकडे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची देखील मोठ्या प्रमाणावर लूट सुरु असल्याने देखील फडणवीसांनी संताप व्यक्त केला.

राज्यातील खासगी रुग्णालयात करोना रुग्णांकडून वाट्टेल तशी बिलांची आकारणी होत असून खुलेआम सुरु असलेली ही लूटमार रोखण्यात सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा दावा विधिमंडळातील विरोधी पक्षाने केला आहे. रुग्णांची लूटमार रोखण्यासाठी कागदी घोडे नाचविणाऱ्या आरोग्य विभागाची चौकशी करण्याची मागणी विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

केवळ सर्वसामान्य करोना रुग्ण खासगी रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा होणाऱ्या लुबाडणुकीबाबत बोलत नाही तर सत्ताधारी शिवसेनेचे अनेक पदाधिकारीही याबाबत बोलत आहेत. ठाणे शहराचे महापौर नरेश म्हस्के यांनी तर याबाबत पालिका आयुक्तांनाच पत्र लिहिले आहे. अन्यत्र राज्यात सत्तेत असल्याने शिवसैनिकांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेतील विरोध पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले. गेले जवळपास पाच महिने खासगी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांकडून लाखांनी उपचाराची बिले वसूल केली जात आहेत. काही रुग्णालयात तर दिवसाचे उपचाराचे बिल पन्नास हजार ते एक लाख रुपये आकारण्यात येत आहे. प्रामुख्याने मुंबई व ठाणे जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांनी करोनाच्या रुग्णांकडून उपचारासाठी किती रक्कम आकारावी याचे ताळतंत्र सोडल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

News English Summary: Opposition in the legislature has claimed that the government has failed to curb the rampant looting of private hospitals in the state.

News English Title: Thackeray Government Unable To Curb Looting Of Private Hospitals Says Devendra Fadnavis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x