28 April 2024 5:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट FD Interest Rate | पैशाने पैसा वाढवा! 1 वर्षाच्या FD वर या 3 बँक देत आहेत 7.75 टक्केपर्यंत व्याज, यादी सेव्ह करा
x

मुंबई लसीकरण फसवणूक | लोकांना फेक इंजेक्शन देणाऱ्या रॅकेटचे 4 लोक मुंबई पोलिसांच्या ताब्यात

Mumbai fake covid vaccine racket

मुंबई, १८ जून | मुंबईच्या हीरानंदानी सोसायटीमध्ये बनावट व्हॅक्सीनेशन ड्राइव्ह चालवून 390 लोकांना इंजेक्शन देणाऱ्या 4 आरोपींना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये एका मोठ्या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. या फसवणुकीचा मास्टरमाइंड 10 वी नापास व्यक्ती आहे. लसींचा जुगाड करणे आणि कँपची जबाबदारी सांभाळण्याचे काम त्याच्या खांद्यावरच होते. ज्या लोकांना पकडण्यात आले आहे, त्यामध्ये एक व्यक्ती मध्यप्रदेशातील रहिवासी आहे. त्याने MP च्या सतना येथून लसींचा पुरवठा केला होता.

तपासात समोर आले आहे की, आरोपींनी 9 सोसायटीजमध्ये अशा प्रकारचेच बनावट लसीकरण कँप लावले होते. लस दिल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला ताप किंवा थकव्याचे लक्षण दिसले नसल्याने त्यांना संशय आला. यानंतर सोसायटीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.

सील तुटलेली व्हॅक्सीन, नकली सर्टिफिकेट:
मुंबईचे अॅडिशनल पोलिस कमिश्नर दिलीप सावंत यांनी म्हटले की, या व्हॅक्सीनेशन ड्राइव्हचे आयोजन सरकार किंवा BMC कडून करण्यात आलेले नव्हते. आतापर्यंत यांनी कोणत्याही अधिकृत सोर्सकडून व्हॅक्सीन खरेदी केल्याचे पुरावेही मिळालेले नाही. तपासात समोर आले आहे की, लोकांना जी व्हॅक्सीन देण्यात आली, त्याचे सील पहिलेच तुटलेले होते. लोकांना जे सर्टिफिकेट देण्यात आले दे तेखील फेक होते आणि ते हॉस्पिटलचे आयडी चोरून तयार करण्यात आले होते याचे पुरावे मिळाले आहेत.

सावंत यांनी सांगितले की, या संपूर्ण खेळाचा सूत्रधार 10 नापास व्यक्ती आहे. तो 17 वर्षांपासून मेडिकल फील्डमध्ये काम करत होता. आतापर्यंत या प्रकरणामध्ये एकूण चार लोकांना अटक झाली आहे. यामध्ये इतर काही रडारवर आहेत. ज्यावेळी हे बनावट लसीकरण ड्राइव्ह सुरू होते, तेथे कोणताही क्वालिफाइड डॉक्टर उपस्थित नव्हता. अजून एका मुलाला मध्यप्रदेशच्या सताना येथून पकडण्यात आले आहे. 9 इतर ठिकाणी पोलिस तपासासाठी जाणार आहे.

तत्पूर्वी भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले होते की, व्हॅक्सीनेशन घोटाळ्यामध्ये बीएमसीचे लोक सामिल आहेत. कांदिवली प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. बोग आधार कार्ड बनवून 18 ते 22 वर्षांपर्यंतच्या लोकांचे लसीकरण करण्यात आले. आरोपींवर कठोर कारवाई व्हायला हवी.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Mumbai fake covid vaccine racket hospital employee among Madhya Pradesh resident arrested news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x