28 March 2024 4:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल? Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील वाढीव दर तपासून घ्या
x

Know Your Postman App Launched | टपाल खात्याचं 'नो युअर पोस्टमन' मोबाईल App लॉन्च

Know Your Postman App Launched

मुंबई, १७ ऑक्टोबर | सध्याचा काळ आणि येणार भविष्य काळ हा आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा आहे. त्यामुळे तंत्रज्ञानात मागे असलेली सरकारी खाती देखील आता तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्पर्धा निर्माण करत आहेत. त्याचाच भाग म्हणजे मुंबई टपाल खात्याने राष्ट्रीय मेल दिन निमित्त ‘नो युअर पोस्टमन’ (Know Your Postman App Launched) हे मोबाईल अॅप्लिकेशन लॉन्च केले आहे. या अॅपद्वारे नागरिक आपल्या परिसरातील बीट पोस्टमनचा तपशील मिळवू शकतात. त्यासाठी नागरिकांना परिसर, क्षेत्र, पोस्ट ऑफिसचे नाव आणि पिन कोड ही माहिती अॅपमध्ये भरावी लागेल.

Know Your Postman App Launched. The Mumbai Postal Department has today launched the Mobile Application ‘Know Your Postman’ on the occasion of National Mails Day. This app allows citizens to get details of Beat Postman in their area. For this, the citizens have to fill in the information of the premises, area, post office name and pin code in the app :

मुंबई टपाल विभागाने डिझाईन आणि डेव्हलप केलेले हे अँड्रॉईड अॅप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. सध्या या अॅप चे फक्त अँड्रॉइड व्हर्जन उपलब्ध आहे. सध्यातरी या अॅपच्या आयओएस व्हर्जनबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मुंबई शहर आणि उपनगरातील 86,000 हून अधिक ठिकाणाची माहिती डेटाबेसमध्ये उपलब्ध आहेत. या अॅपमधून स्थानिक पोस्टमन, त्याचे संपर्क क्रमांक, संलग्न पोस्ट ऑफिसचे नाव, पत्ता आणि फोन नंबर बद्दल माहिती नागरिकांना मिळते.

या अॅपद्वारे मुंबई पोस्टचा डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देण्याचा इनहाऊस प्रयत्न आहे. आतापर्यंत 86,000 पेक्षा जास्त पत्ते टॅप केले गेले आहेत,” अशी माहिती भारतीय डाकच्या मुंबई क्षेत्राच्या पोस्टमास्टर जनरल स्वाती पांडे यांनी दिली. अॅपमध्ये जर पत्ता सापडला नाही तर नवीन पत्ता टाकण्याचा पर्याय अॅप देतो. या अॅपमध्ये एक लिंक दिली आहे ज्यावर क्लिक करून नागरिक त्यांच्या पत्त्याचा तपशील टाकू शकतात. तसंच पोस्ट विभागाकडून त्यांचा पत्ता 24 तासात उपडेट करण्यात येईल असेही पांडे म्हणाल्या.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: Know Your Postman App Launched on the occasion of National Mails Day.

हॅशटॅग्स

#Technology(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x