15 December 2024 6:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी
x

वरळी कोळीवाड्यातून लोकं समुद्रमार्गे माहीम'मध्ये बाजारासाठी; ५ जण अटकेत

Corona Crisis, Covid 19, Worli Koliwada

मुंबई, ४ एप्रिल: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघ कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. या भागात फैलावणारा कोरोना रोखण्यासाठी प्रशासनानं युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केले असून रुग्ण आढळलेला परिसर सील करण्यात आला आहे. मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण जी दक्षिण विभागात आहेत. कोरोनाचे तब्बल ३४ रुग्ण या विभागात सापडले आहेत. जी दक्षिण विभागात सापडलेल्या ३४ पैकी दोन रुग्णांचा मृत्युही झाला आहे.

जी दक्षिण विभागातील वरळी कोळीवाड्यात १० रुग्ण आहेत. याशिवाय प्रभादेवी, आदर्शनगर, लोअर परेल या भागातही कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. जी दक्षिण विभागात ३४ रुग्ण सापडल्यानं हा भाह सर्वाधिक डेंजर झोन ठरला आहे. त्यामुळे वरळी कोळीवाडा पूर्ण सील करण्यात आला आहे. तसंच ज्या भागात रुग्ण सापडले आहेत, तो परिसरही सील करण्यात आला आहे.

वरळी कोळीवाडा हा भाग करोनासाठी मुंबईत सर्वाधिक संवेदनशील बनला असताना या भागातील लोक आवश्यक किराणा व अन्य वस्तू आणण्यासाठी बंदी आदेश मोडून समुद्रमार्गे माहीमला जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली असून पोलिसांनी अशा पाच जणांना अटक केली आहे. वरळी कोळीवाड्यातील अनेक नागरिक किराणा सामानाची खरेदी करण्यासाठी सध्या समुद्रमार्गे माहीमला जात असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या आधारे पोलिसांनी टेहळणी केली असता त्यात तथ्य आढळून आले असून आतापर्यंत पोलिसांनी अशा पाच जणांना अटक केली आहे.

वरळी कोळीवाड्यात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या भागातील एका कोळी नेत्याचाही करोनाने मृत्यू झाला. वरळीतील कॅम्प भागातील एका पोलीस कॉन्स्टेबललाही करोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर वरळी कोळीवाडा पूर्णपणे सील करण्यात आला आहे तर वरळी कॅम्पचा काही परिसर सील करण्यात आला आहे. असे असताना काही नागरिक असंवेदनशीलपणे वागत असल्याचे निदर्शनास आले आहे.

 

News English Summary: While Worli Koliwada became the most sensitive area in Mumbai for Coronation, it was shocking that people from this area were breaking the ban order for bringing necessary groceries and other items by boat to Mahim. Police have arrested five such persons.

 

News English Title: Story Corona virus Worli Koliwada residents using sea route to reach Mahim for purchase of essential grains Mumbai Police arrested 5 peoples News Latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x