30 June 2022 5:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
बहुमत चाचणी उद्याच घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश | तत्पूर्वी मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार Motorola G42 | मोटोरोला जी 42 स्मार्टफोन भारतात लाँच होणार | 50 मेगापिक्सल कॅमेरा | किंमत आणि वैशिष्ठ्ये पहा Innova Captab IPO | इनोव्हा कॅपटॅप फार्मा कंपनी आयपीओ लाँच करणार | कंपनीचा तपशील जाणून घ्या Horoscope Today | 30 जून 2022 | तुमच्या राशींनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Drinking Water During Meals | या 5 कारणांसाठी जेवताना पाणी पिणे टाळा | वाचा ती कारणं Income Tax Return | तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल? | अधिक जाणून घ्या फ्लोअर टेस्टवेळी भाजपला पाठिंबा देण्याच्या फडणवीसांच्या मागणीला राज ठाकरेंचा होकार
x

कोरोना आपत्ती: विप्रोच्या अझिम प्रेमजी फाऊंडेशनकडून ११२५ कोटीची मदत

Corona Crisis, Covid 19, Azim Premji Foundation Wipro

मुंबई, ०१ एप्रिल: कोरोनाचा सामना करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज मोठ्या प्रमाणावर भासणार आहे. हीच बाब लक्षात घेऊन विप्रो लिमिटेड, विप्रो इंटरप्रायझेस आणि अझिम प्रेमजी फाऊंडेशननं कोट्यवधींचा निधी जाहीर केला आहे. विप्रो लिमिटेडनं १०० कोटी, विप्रो इंटरप्रायझेसनं २५ कोटी, तर अझिम प्रेमजी फाऊंडेशननं १००० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरवर्षी विप्रो कंपनी आणि अझिम प्रेमजी फाऊंडेशन काही रक्कम सीएसआरच्या माध्यमातून दान करते. मात्र ही रक्कम त्यातील नसून अतिरिक्त असल्याचं विप्रोनं निवेदनातून स्पष्ट केलं आहे.

तत्पूर्वी, करोनाशी लढण्यासाठी केंद्राच्या आणि राज्याच्या सहाय्यता निधीसाठी मदतीचा ओघ सुरु झाला होता. यामध्ये टाटा ट्रस्टने आजवरची सर्वात मोठी मदत जाहीर केली आहे. ट्रस्टने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ५०० कोटी रुपये देऊ केले आहेत.

त्यानंतर टाटा ग्रुपने पुन्हा सर्वात मोठी मदत जाहीर केली होती. टाटा ट्रस्टने केंद्र सरकारला विविध उपाययोजनांसाठी ५०० कोटी रुपयांच्या मदतीची शनिवारी घोषणा केली. त्यानंतर काही वेळातच टाटा सन्सने अतिरिक्त १००० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे टाटा ग्रुपने एकून १५०० कोटी रुपये करोनाशी लढण्यासाठी दिले आहेत.

 

News English Summary: The need for financial help to cope with Corona is going to be huge. With this in mind, Wipro Ltd, Wipro Enterprises and Azim Premji Foundation have announced billions of funds. Wipro Limited has announced a grant of Rs 100 crore, Wipro Enterprises 25 crore and Azim Premji Foundation Rs 1000 crore. Each year, Wipro Company and the Azim Premji Foundation donate some money through CSR. However, the statement states that the amount is not an additional amount.

 

News English Title: Story Azim Premji Foundation Wipro commit 1125 crore tackle Corona virus crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x