15 December 2024 7:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

परदेशातून भारतात येणाऱ्यांवर १ फेब्रुवारीपासूनच बंदी का घातली नाही; भाजपचे नेते बरसले

Corona Crisis, Covid 19, BJP MP Subramanian Swamy

नवी दिल्ल्ली, ०१ एप्रिल: निजामुद्दीनमधील तबलिग जमात मरकजच्या मौलानावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सरकारच्या आदेशांचं उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारने जमावबंदीचे आदेश देऊनही आणि सोशल डिस्टन्सिंगच्या सूचना असतानाही त्या न पाळल्याचा मौलानांवर आरोप आहे.

दिल्लीतील निझामुद्दीन तबलिगी मर्कझ येथील धार्मिक कार्यक्रमात पुण्यातील १३० हून अधिक लोक उपस्थित होते, आतापर्यंत यातल्या ६० लोकांना शोधून विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. धार्मिक कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या १३० पुण्यातील लोकांचा शोध घेतला जात आहे त्यातले अनेक लोक हे सध्या पुण्यात नाही किंवा त्यांचा शोध लागत नाही अशीही माहिती त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे.

दरम्यान, लॉकडाउन देखील उशिरा केला गेल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. त्यावरून भाजपचे नेते सुब्रमण्यण स्वामी यांनी आता आपल्या पक्षाच्या सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. परदेशातून भारतात येणाऱ्या नागरिकांवर एक फेब्रुवारीपासूनच बंदी का घातली गेली नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. जर एक फेब्रुवारीलाच ही बंदी घातली असती तर दिल्लीत निजामुद्दीनमध्ये तबलिगी समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात जे घडले ते निश्चितपणे घडले नसते, असा दावा त्यांनी केला.

सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर एक फेब्रुवारीपासूनच बंदी घातली गेली असती तर दिल्लीत तबलिगी समाजाच्या कार्यक्रमात जे घडले ते घडले नसते. त्याचवेळी परदेशात गेलेल्या आणि तेथून परतणाऱ्या नागरिकांनाही एक फेब्रुवारीपासूनच विमानतळाजवळच्या हॉटेलमध्ये १४ दिवस ठेवायला हवे होते. तसे केले असते तर आजची परिस्थिती ओढावली नसती. ही बंदी घालायला एवढा उशीर का लावण्यात आला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

 

News English Summary: Meanwhile, allegations that the lock down has also been delayed are now beginning. From this, BJP leader Subramanian Swamy has now given his party’s government a home run. He has asked why citizens coming from abroad have not been banned since February 1. If the ban had been banned only on February 1, then what would have happened in Nizamuddin’s religious program in Nizamuddin in Delhi would not have happened, he claimed. In a tweet by Subramanian Swamy, it was stated that if the citizens coming from abroad were banned from February 1, then what would have happened at the Tbiligi community event in Delhi would not have happened. At the same time, citizens who had come and returned from abroad also had to stay in a hotel near the airport for 14 days from February 1. Had it been so, today’s situation would not have been over. He has raised the question as to why the ban was made so late.

 

News English Title: Story Subramanian Swamy says why ban not imposed on foreigners around 1 February Tablighi Jamaat case won not happen News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x