27 November 2022 5:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus 11 5G Smartphone | लाँचिंगपूर्वी वनप्लस 11 स्मार्टफोनची माहिती लीक, फीचर्स आणि किंमत पहा Google Messages | गुगल शॉर्ट्सने इन्स्ट्राग्रामचा बँड वाजवल्यानंतर व्हॉट्सॲपचा बँड वाजवणार गुगल मेसेजेस? Bhediya Day Box Office | भेडिया सिनेमाची धमाकेदार कमाई, प्रेक्षकांच्या प्रतिसादाने कलेक्शन जोमात Business Idea | 1 लाख मासिक उत्पन्नासाठी सुरू करा हा व्यवसाय, सरकारकडून 35 टक्के अनुदान देईल, प्रोजेक्ट डिटेल्स Airtel Jio 5G | देशातील कोणत्या शहरांमध्ये उपलब्ध आहे 5G सेवा, पाहा संपूर्ण यादी, तुमचं शहर आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर शिंदेचं दुर्लक्ष, पण कंटेनर भरून खोके दिले अशा वायफळ प्रतिक्रियांसाठी प्रचंड वेळ? Drishyam 2 Box Office | अजय देवगनच्या सिनेमाने मोडले अनेक रेकॉर्ड्स, शनिवारी मोठी कमाई, किती कलेक्शन?
x

आदित्य ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यात शिवसैनिक आणि शेतकऱ्यांची तुफान गर्दी, शिंदे गटातील आमदारांवर जोरदार हल्लाबोल

Aaditya Thackeray

Aaditya Thackeray Auragabad Rally | नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीगाठी आणि सभांसाठी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादचा जोरदार दौरा केला. यावेळी त्यांनी शिंदे गटातील आमदार आणि नेत्यांना अक्षरशः झोडपून तर काढलं पण त्यांना स्थानिक शिवसैनिक आणि शेतकऱ्यांचा जोरदार पाठिंबा मिळायचं पाहायला मिळालं. ‘मला पप्पू म्हणताय. मी राजीनामा देतो तुम्ही चाळीस लोक राजीनामा द्या मग पाहू कोण गद्दार आहेत’ असं थेट आव्हानच आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला दिलं आहे. या सभांना तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं.

आदित्य ठाकरे आज अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी बाळापूर इथं सभा पार पडली. या सभेत आदित्य ठाकरे यांनी आमदार नितीन देशमुख यांना व्यासपीठावर मिठ्ठी मारली. नितीन देशमुख हे शिंदे गटात न जाता सुरतहून माघारी परतले होते. यावेळी सभेत बोलत असताना आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडलं.

राज्यातील जनतेला, शेतकऱ्यांना उघड्यावर सोडणाऱ्या सरकारचा निषेध करत , आदित्य ठाकरे यांनी ४० आमदारांना आव्हान दिलंय . सरकार म्हणून ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाकी करा . तसंच तुम्हाला जनतेने गद्दार म्हणून नाही , राज्यकर्ते म्हणून स्वीकारलं असेल, तर तुम्हाला चेलेंज देतो,, मी राजीनामा देतो, तुम्ही ४० जण राजीनामा देऊन निवडणुका घ्या,, बघुयात जनतेचा कौल काय आहे . हे थेट आव्हान आदित्य ठाकरे यांनी सरकारमधील फुटीर आमदारांना दिलंय.

यावेळी राज्यातून बाहेर जाणाऱ्या उद्योगांवर देखील आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलंय . “महाराष्ट्रात एवढं विचित्र वातावरण आहे, उद्योग राज्यातून पळून जातायत, शेतकऱ्यांचं कोणी ऐकत नाही , वर खरं मुख्यमंत्री कोण आपल्याला माहिती नाही , गदारांचा शिक्का माथ्यावर घेऊन फिरतायत” असं म्हणत सरकारवर घणाघात केलाय.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Aaditya Thackeray Aurangabad huge rally check details 07 November 2022.

हॅशटॅग्स

#Aaditya Thackeray(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x