29 May 2022 4:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
x

लालू प्रसाद यादव यांना साडेतीन वर्षाचा तुरुंगवास : स्पेशल सीबीआय कोर्ट

रांची : रांचीच्या स्पेशल सीबीआय कोर्टात काल आरजेडी चे सर्वेसेवा लालू प्रसाद यांना चारा घोटाळा प्रकरणी शिक्षा ठोठावण्यात आली. निकालानुसार त्यांना साडेतीन वर्ष तुरुंगवास आणि ५ लाख रुपये दंड सुनावण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर त्यांना आता जेलमध्ये माळीकाम करण्याचे आदेशच देण्यात आले आहेत. म्हणजे एकेकाळी बिहारचे मुख्यमंत्री आणि भारताचे रेल्वे मंत्री अशी पद भूषविणारे लालू प्रसाद यादव आता जेलमध्ये चक्क माळी काम करतील. विशेष म्हणजे त्यांना दिवसाला ९३ रुपये असा कामाचा मोबदला ही मिळणार आहे.

परंतु रांची कोर्टाच्या या निर्णयाविरोधात लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. लालू प्रसाद यादव यांच्या व्यतिरिक्त इतरही सहा आरोपींना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इतरही खटल्यात लालू प्रसाद यादव हे दोषी असून त्या खटल्यांसंदर्भातील निकालही लवकरच लागण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x