15 August 2022 10:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Financial Tips | आर्थिक स्वातंत्र्यासाठी या 5 गोष्टी लक्षात ठेवा, सर्व आर्थिक चिंतांपासून होईल सुटका Numerology Horoscope | मंगळवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं अंकज्योतिष शास्त्र Old Salary Account | तुमच्या जुन्या सॅलरी अकाउंटमुळे तुम्हाला हे 5 नुकसान होतात, अशाप्रकारे लवकर बंद करा Ola S1 e-Scooter | ओला S1 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, 141 किमी रेंजचा दावा, किंमतीसह सर्व माहिती जाणून घ्या Horoscope Today | 16 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Utsav Deposit Scheme | एसबीआयने सुरु केली उत्सव फिक्स्ड डिपॉझिट योजना, जाणून घ्या योजनेचे फायदे Gold Bond Scheme | तुम्हाला स्वस्त सोनं खरेदीची संधी मिळणार, जाणून घ्या कधीपर्यंत गुंतवणूक करू शकाल
x

देशात 2020 मध्ये रोज 77 बलात्काराच्या घटना | २ भाजपशासित राज्य टॉप थ्री मध्ये | महाराष्ट्राचा क्रमांक कितवा? - NCRB डेटा

NCRB report

नवी दिल्ली, १५ सप्टेंबर | महिलावंरील बलात्काराच्या घटनांबाबत धक्कादायक माहिती राष्ट्रीय गुन्हे अहवाल ब्युरोमधून (एनसीआरबी) समोर आली आहे. 2020 मध्ये रोज सरासरी 77 बलात्काराच्या घटना घडल्या आहे. या वर्षात 28,046 बलात्काराच्या घटना घडल्याचे एनसीआरबीच्या आकडेवारीमधून समोर आले आहे.

देशात 2020 मध्ये रोज 77 बलात्काराच्या घटना, २ भाजपशासित राज्य टॉप थ्री मध्ये, महाराष्ट्राचा क्रमांक कितवा? – NCRB डेटा – NCRB report shows 77 incidents of physical abuse per day in 2020 against women’s :

गतवर्षी महिलांविरोधातील अन्यायाचे एकूण 3,71,503 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर 2019 मध्ये महिलांशी संबंधित 4,05,326 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर 2018 मध्ये महिलांशी संबंधित 3,78,236 गुन्हे नोंदविण्यात आल्याचे एनसीआरबीच्या अहवालात म्हटले आहे.

कोरोना महामारीतही बलात्काराच्या गुन्ह्यांचे प्रमाण जास्त:
2020 मध्ये कोरोना महामारी आणि देशात टाळेबंदी सुरू होती. या काळात महिलांवरी 28,046 बलात्काराची प्रकरणे घडली आहेत. यामधील 25,498 हे पीडित हे प्रौढ तर 2,655 पीडित हे 18 वर्षांहून कमी होते. भारतीय दंडविधान कायदा कलम 376 नुसार बलात्काराच्या प्रकरणाची गुन्हा म्हणून नोंद होते. 2019 मध्ये 376 कलमानुसार 32,033 तर 2018 मध्ये 33,356 तर 2017 मध्ये 32,559 बलात्कार प्रकरणांची पोलिसांत नोंद झाली आहे.

महिलांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये ही राज्ये आहेत आघाडीवर:
2020 मध्ये सर्वाधिक म्हणजे 5310 बलात्काराची प्रकरणे एकट्या राजस्थानमध्ये घडली आहेत. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशमध्ये 2,769, मध्यप्रदेशमध्ये 2,339, महाराष्ट्रात 2061 तर आसाममध्ये 1,657 बलात्काराची प्रकरणे घडली आहेत. तर दिल्लीमध्ये 997 बलात्काराची प्रकरणे घडली आहेत.

अशी आहे इतर गुन्ह्यांची आकडेवारी:
1. नातेवाईक अथवा पतीकडून महिलांना क्रुरतेची वागणूक मिळण्याची 1,11,549 प्रकरणे गतवर्षी नोंदविण्यात आली आहेत.
2. 62,300 प्रकरणांमध्ये महिलांचे अपहरण आणि पळवून नेण्याची प्रकरणे समोर आली आहेत.
3. बलात्काराशिवाय बलात्काराचा प्रयत्न करण्याची एकूण 3,741 गुन्हे नोंदविल्याचे एनसीआरबी डाटामध्ये म्हटले आहे.
4. 2020 मध्ये महिलावर अॅसिड फेकण्याची 105 प्रकरणे घडली आहेत.
5. हुंड्यामुळे 7,045 महिलांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, एनसीआरबी ही केंद्रीय गृहमंत्रालयांतर्गत काम करणारी संस्था आहे. ही संस्था देशभरातील गुन्हेगारीची आकडेवारीचे संकलन करते. तसेच भारतीय कायद्याप्रमाणे या गुन्ह्यांचे विश्लेषण करते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: NCRB report shows 77 incidents of physical abuse per day in 2020 against women’s.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x