15 December 2024 6:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

राजकारणाचा कळस | विरोधकांच्या पत्नी रडारवर | संजय राऊतांच्या पत्नीला ईडीची नोटीस

ED notice, Shivsena MP Sanjay Raut, wife Varsha Raut

मुंबई, २७ डिसेंबर: भारतीय जनता पक्षामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावली आहे. या नोटीसनुसार एकनाथ खडसे यांना ३० डिसेंबर रोजी चौकशीसाठी ईडी समोर हजर राहावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला होता. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. “आमच्या शिवसेनेच्या लोकांनाही नोटीस आल्या आहेत. जे तुमच्या विरोधात आहेत, ज्यांच्याशी तुम्ही राजकीय सामना करु शकत नाही अशा लोकांना ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सकडून बळाचा वापर करुन नमवण्याचा प्रयत्न करणार असाल तर तसं होणार नाही. यासाठीच विरोधी पक्षाने एकत्र यावं आणि मजबूत संघटन उभं करावं अशी आमची भूमिका आहे,” असं संजय राऊत यांनी सांगितलं होतं.

मात्र आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)कडून समन्स बजावण्यात आलं आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. मंगळवार २९ डिसेंबर रोजी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.कलम ६७ अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्यामुळे आता वर्षा राऊत यांना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.

अद्याप तरी संजय राऊत किंवा वर्षा राऊत यांच्याकडून याबाबत कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून काहीजणांची चौकशी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर एका जुन्या प्रकरणाच्या चौकशीत वर्षा राऊत यांचं नाव समोर आल्याने, त्यांना समन्स बजावण्यात आलेलं आहे.

मागील काही दिवसांपासून देशातील सत्ताधाऱ्यांनी थेट राज्यातील विरोधकांच्या पत्नींना चौकशीच्या रडारवर घेतलं आहे. त्याची सुरुवात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यापासून झाली होती आणि आता संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत रडारवर असल्याचं दिसतं. राज्यात भाजपाला अडथळे ठरणाऱ्या विरोधकांना भावनिक दृष्ट्या गुंडाळण्याची नवी चाल दिल्लीतून आखली गेल्याचा आरोप सुरु झाला असून त्यासाठी भाजपचे राज्यातील नेते कोणाला लक्ष करावं याबद्दल माहिती दिल्लीत देत असल्याची शंका महाविकास आघाडीतील सत्ताधारी बोलू लागले आहेत. मात्र महाविकास आघाडी देखील भाजपच्या राज्यातील मोठ्या नेत्यांना लवकरच रडारवर घेईल असं म्हटलं जातंय.

 

News English Summary: Shiv Sena leader MP Sanjay Raut’s wife Varsha Raut has been summoned by the Directorate of Recovery (ED). He has been issued the notice in the PMC Bank scam case. He has been asked to be present at the ED office on Tuesday, December 29. The notice has been served under section 67. So now Varsha Raut will have to face the ED’s inquiry. So far no response has been received from Sanjay Raut or Varsha Raut. The ED is investigating some people in the PMC Bank scam. Varsha Raut’s name has come up in the investigation of an old case against this background, he has been summoned.

News English Title: ED notice to Shivsena MP Sanjay Raut wife Varsha Raut news updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x