13 April 2021 7:18 PM
अँप डाउनलोड

दिल्लीत अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये ‘अग्नितांडव’; १७ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दिल्लीत करोलबागमधील अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये आज पहाटे ४ वाजता भीषण आग लागली होती. या आगीत होरपळून जवळपास १७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच मृत्युमुखी पडलेल्यांच्या आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून तब्बल ४ तास चाललेल्या बचाव मोहिमे दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांनी पन्नास जणांची सुटका केली. पहाटे सर्वजण गाढ झोपेत असताना सदर घटना घडल्याचे वृत्त आहे.

अर्पित पॅलेस या ३ मजली हॉटेलमधील सर्वच्या सर्व ३५ रुम बुक होत्या. नेमकी आग कशामुळे लागली ते अजून कारण स्पष्ट झालेले नाही. पण शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, सकाळी ७.३० च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. दरम्यान, ८ वाजल्यापासून कुलिंग ऑपरेशन सुरु झाले.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x