27 May 2022 5:40 AM
अँप डाउनलोड

न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी होणार नाही: सर्वोच न्यायालय

नवी दिल्ली : अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या न्यायमूर्ती बी.एच.लोयांच्या मृत्यूप्रकरणाच्या खटल्याकडे आणि आज अखेर त्यावर सर्वोच न्यायालयाने निकाल देत न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी होणार नाही असा स्पष्टं निर्णय सर्वोच न्यायालयाने आज दिला.

न्यायमूर्ती बी.एच.लोयांच्या मृत्यूप्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी एक याचिका सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आली होती. त्या याचिकेवर आज सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्या खंडपीठाने निर्णय दिला असून न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी होणार नाही असं स्पष्ट केलं आहे.

१ डिसेंबर २०१४ रोजी न्यायमूर्ती बी.एच.लोयां आपल्या सहकाऱ्याच्या मुलीच्या लग्नासाठी नागपूरला गेले होते तेंव्हा तिथं त्यांचा मृत्यू झाला. परंतु कॅराव्हान मॅगेझिननं ४ महिन्यांपूर्वी न्यायमूर्ती बी.एच.लोयां मृत्यू संशयास्पद असल्याची बातमी दिली होती आणि देशभर खळबळ उडाली होती. त्यामुळे न्यायमूर्ती बी.एच.लोयांच्या मृत्यूप्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी एक याचिका सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आली होती. त्यावर अंतिम निर्णय देताना सर्वोच न्यायालयाने अंतिम निकाल देत न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी होणार नाही असा स्पष्टं निर्णय आहे. विशेष सीबीआय न्यायाधीश बी.एच.लोयां हे सोहराबुद्दीन बनावट एन्काऊंटरच्या खटल्याची सुनावणी करत होते त्यामुळे हा विषय देशभरात चर्चेला आला होता.

हॅशटॅग्स

#Amit Shah(261)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x