23 September 2021 1:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

मग कोरोना लसीकरणाच्या सुरुवातीला केलेल्या वाईट कामागिरीसाठी तुम्ही केंद्र सरकारला देशविरोधी म्हणणार का? - रघुराम राजन

Raghuram Rajan

मुंबई, १५ सप्टेंबर | भारतामधील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या ‘इन्फोसिस’वर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक मुखपत्र असणाऱ्या ‘पांचजन्य’मधून करण्यात आलेल्या टीकेसंदर्भात राजन बोलत होते. ‘इन्फोसिस’ कंपनीच्या माध्यमातून एखादी देशविरोधी शक्ती देशाच्या आर्थिक हिताविरोधात तर काम करीत नाही ना, अशी शंका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक ‘पांचजन्य’ या साप्ताहिकामध्ये व्यक्त करण्यात आली होती. वस्तू व सेवाकर (GST) आणि प्राप्ती कर पोर्टलमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींच्या अनुषंगाने ही टीका करण्यात आली होती.

BhagyaVivah Marathi Matrimonial

कोरोना लसीकरणाच्या सुरुवातीला केलेल्या वाईट कामागिरीसाठी तुम्ही केंद्र सरकारला देशविरोधी म्हणणार का? – Would you call central government anti national said Raghuram Rajan on RSS Magazines Barb at Infosys :

त्यालाच अनुसरून कोरोना लसीकरणाच्या बाबतीत सुरुवातीच्या काळामध्ये केलेल्या वाईट कामागिरीसाठी तुम्ही केंद्र सरकारला देशविरोधी म्हणणार का असा थेट सवाल आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मंगळवारी उपस्थित केला. मागील काही काळामध्ये सरकार किंवा सरकारच्या जवळच्या व्यक्तींकडून अनेक खासगी कंपन्यांवर किंवा त्यांच्याशीसंबंधित व्यक्तींवर बेछूट आरोप करण्यात आल्याचे प्रकार घडले असून ‘इन्फोसिस’ हे त्यामधील ताजे उदाहरण आहे असं देखील ते म्हणाले.

हे वक्तव्य काहीच कामाचं नाहीय असं मला वाटतं. करोना लसीकरणाच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये चांगलं काम न करणाऱ्या सरकारला तुम्ही दोष देत देशविरोधी म्हणणार का? तुम्ही त्याचा चूक म्हणता आणि लोक चुका करत असतात,” असं मत राजन यांनी व्यक्त केलं. जीएसटी हे त्याचं उदाहरण असल्याचंही राजन यांनी म्हटलं. “जीएसटीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय मला फार योग्य वाटला नाही. ते अजून चांगल्या पद्धतीने करता आलं असतं. मात्र या चुकांमधून शिकलं पाहिजे. त्यांचा वापर तुमचे जुने हेवे दावे काढण्यासाठी होता कामा नये,” असा टोला राजन यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना लगावला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Would you call central government anti national said Raghuram Rajan on RSS Magazines Barb at Infosys.

हॅशटॅग्स

#Raghuram Rajan(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x