23 September 2021 1:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

Anil Parab Vs Somaiya | अनिल परब सोमैयांच्या विरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार | नोटीस पाठवली

Anil Parab

मुंबई, १५ सप्टेंबर | माजी खासदार आणि भाजपाचे नेते किरीट सोमैया यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सोमैया यांच्याकडून वारंवार होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर म्हणून अनिल परब आता सोमैया यांच्यावरती 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. या प्रकरणी परब यांचे वकील सुषमा सिंग यांनी सोमैय्यांना एक बिनशर्त माफी मागण्याची नोटीस पाठवली आहे. त्यानुसार आता सोमैय्या यांना 72 तासात उत्तर देण्यास सांगतिले आहे. सोमैया यांनी परब यांच्यावर कोकणात दापोली येथे बेकायदा हॉटेल बांधल्याचा आरोप केला होता. या बरोबर त्यांच्या खात्याअंतर्गत परिवहन विभागात बदल्याचे रॅकेट परब यांनी चालवल्याचा जाहीर आरोपही सोमैय्या यांनी केला होता.

BhagyaVivah Marathi Matrimonial

अनिल परब सोमैयांच्या विरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार, नोटीस पाठवली – Transport minister Anil Parab to file defamation suit against BJP leader Kirit Somaiya over allegations :

बिनशर्त जाहीर माफी मागावी.. अन्यथा:
किरीट सोमैया गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गैरव्यवहारप्रकरणी सोमैया यांनी अनेकदा शिवसेना नेत अनिल परब यांचे नाव घेतले होते. अनिल देशमुख नंतर अनिल परब आत जाणार, असा दावा अनेकदा सोमैया यांनी केला होता. परब यांच्या विरोधात त्यांनी काही पुरावेही ईडीला दिले होते. मात्र काही दिवस बॅकफुटला असणारे परब हे सोमैया विरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांनी सोमैया यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तीन दिवसांत बिनशर्त जाहीर माफी मागावी तसेच बदनामीकारक व बिनबुडाचे आरोप करणे न थांबविल्यास 100 कोटींचा दावा दाखल करण्याचा इशाराही परब यांनी दिला आहे.

सोमैया यांनी मे २०२१ पासून प्रसिद्धिमाध्यमांमधून सातत्याने अनिल परब यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे भारतीय दंड संहितेच्या कलम ४९९ व ५०० चा भंग होत आहे. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी तीन दिवसांमध्ये समाजमाध्यमांमध्ये प्रसारित केलेला मजकूर काढून टाकावा, त्यांचे आरोप मागे घ्यावेत आणि वृत्तपत्रांमधून जाहीर माफी मागावी, अशी नोटीस परब यांच्या वतीने अँड. सुषमा सिंग यांनी बजावली आहे.

खरमाटे आणि माझा काही सबंध नाही:
सोमैया यांनी बजरंग खरमाटे यांच्या सांगली व पुणे मालमत्तांना भेटी देण्याबाबत ट्वीट केले होते. खरमाटे हे परब यांचे सचिव असल्याचा उल्लेख करून त्यांच्याशी संबंध जोडला. वास्तविक खरमाटे हे परिवहन विभागातील अधिकारी असून माझा त्यांच्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण मंत्री अनिल परब यांनी दिले आहे.

राष्ट्रवादीचे नेते मुश्रीफही ठोकणार 100 कोटींचा दावा:
भाजप नेते किरीट सोमैया यांनी पत्रकार परिषद घेत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. तसेच मुश्रीफ यांचा मनी लॉन्ड्रिंग आणि बेनामी व्यवहारांमध्ये सहभागी असल्याचाही आरोप आरोप सोमैया यांनी केला. या आरोपानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनीही पत्रकार परिषद घेत किरीट सोमैया यांनी केलेले माझ्यावरील आरोप चुकीचे असून त्यांच्यावर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Transport minister Anil Parab to file defamation suit against BJP leader Kirit Somaiya over allegations.

हॅशटॅग्स

#Anil Parab(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x