19 July 2019 9:42 AM
अँप डाउनलोड

अवैध वाहन पार्किंग: अनधिकृत फेरीवाले मोकाट; तर वाहन मालकांवर नियमानुसार दरोडे

अवैध वाहन पार्किंग: अनधिकृत फेरीवाले मोकाट; तर वाहन मालकांवर नियमानुसार दरोडे

मुंबई : मुंबई महापालिकेतर्फे सार्वजनिक वाहनतळांलगतच्या ५०० मीटर पर्यंतच्या हद्दीत अवैधरीत्या वाहन पार्किंग करणाऱ्या वाहनांविरुद्ध आजपासून धडक दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. जी दक्षिण विभागात पहिला दंड ठोठावत पहिल्या दिवशी एकूण ५६ वाहनांविरुद्ध कारवाई करण्यात आली असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट केले आहे. यापैकी एकूण ९ वाहनमालकांनी प्रत्येकी दहा हजार रुपये दंड भरून वाहने सोडवून घेतली. तर उर्वरित ४७ वाहने महापालिकेच्या ताब्यात असून ती परत देताना दंडासह विलंब शुल्क आकारले जाणार असल्याचे देखील सांगितले आहे.

महापालिकेच्या २३ सार्वजनिक वाहनतळांलगतच्या अनधिकृत पार्किंगविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले होते. या कारवाईअंतर्गत संबंधित परिसरात एखादे अवजड वाहन अनधिकृतपणे उभे असल्याचे आढळल्यास त्यावर किमान १५,००० रुपये इतका दंड आकारणी करण्यात येणार आहे. मध्यम आकाराच्या वाहनांवर रुपये ११ हजार; तर कार-जीप यासारखी वाहने अनधिकृतपणे पार्क केल्याचे आढळल्यास त्यावर १० हजार रुपये एवढी दंड आकारणी करण्यात येणार आहे.

रिक्षा, साइडकार असलेले दुचाकी वाहन इत्यादी ३ चाकींवर रुपये ८,०००, तर अनधिकृतपणे पार्क केलेल्या दुचाकी वाहनांवर किमान ५,००० रुपये एवढी दंड आकारणी करण्यात येणार आहे. सध्या २३ ठिकाणी सार्वजनिक विक्री करण्यात येणार आहे. दरम्यान मुंबई शहरात अशी एक जागा सापडणार नाही जेथे अनधिकृत फेरीवाल्यांच्या सुळसुट नसेल. मात्र प्रतिदिन हफ्त्यावर सर्वकाही ठरवून चालतं हे सर्वश्रुत आहे. मात्र त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही आणि झाली तरी मुंबईकरांना दाखविण्यासाठी वरचेवर कारवाई करून काही वेळातच सर्वकाही पुन्हा सुरळीत होते हे नित्याचे झाले आहे. त्यामुळे रोड टॅक्स भरून देखील पालिकेकडून कोणतीही सार्वजनिक पार्किंग व्यवस्था उपलब्ध नसते आणि त्याचा भुर्दंड सामान्यांना भोगावा लागत आहे.

अनुरूप वधू - वर सुचक मंडळ

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या