28 March 2023 2:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Khadim India Share Price | या कंपनी व्यवस्थापनतील फेरबदलांमुळे हा शेअर फोकसमध्ये आला, गुंतवणूक करावी का? Stocks To Buy | स्वस्त शेअर आश्चर्यकारक परतावा, किंमत 100 रुपयांपेक्षा ही कमी, अल्पावधीत मिळणार 60 टक्के परतावा, लिस्ट सेव्ह करा SIP Calculator | 1000 रुपयांच्या एसआयपीने 50 लाख मिळतील, एसआयपी कॅल्क्युलेटरने समजून घ्या फायदा New Tax Calculator | पगार वार्षिक 10 लाख रुपये, नवीन विरुद्ध जुनी टॅक्स व्यवस्था, किती टॅक्स भरावा लागेल पाहा PPF Calculator | जर PPF मध्ये दरमहा 10,000 रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीला किती मोठी रक्कम मिळेल? गणना समजून घ्या ITR Filing 2023 | 1 एप्रिलपासून करदात्यांना ITR फाईल करता येणार, कोणते नवे फायदे मिळतील पहा SIP Calculator | स्वतःच 1 कोटींचं घर घ्यायचं असल्यास किती SIP करून शक्य होईल? फायद्याचं गणित समजून घ्या
x

व्यवसाय कर्ज योजना उद्योग उभारणीसाठी १० लाखापर्यंत अनुदान | वाचा आणि शेअर करा

Business loan

मुंबई, २२ जून | आजच्या या लेखामध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी व्यवसाय कर्ज योजना कोणत्या आहेत आणि त्या योजनांचा लाभ कसा घ्यावा या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ज्या व्यक्ती खाजगी नोकरीमध्ये होते लॉकडाऊनमुळे त्यांची ती नोकरी सुद्धा गेल्यामुळे बेरोजगारीमध्ये आणखीच भर पडली आहे. अशा सुशिक्षित बेरोजगार तरुणांना या योजना माहित असाव्यात जेणे करून ते या योजनांचा लाभ घेऊ शकतील.

व्यवसाय करण्यास कर्ज न मिळाल्यामुळे अनेक तरुणांचा हिरमोड:
अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण व्यवसाय करण्यास इच्छुक आहेत. त्यांच्याकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणारे कौशल्य देखील असते. परंतु केवळ व्यवसाय करण्यासाठी पैसे नसल्यामुळे ते व्यवसाय उभारू शकत नाहीत. व्यवसायासाठी खाजगी कर्ज काढायचे म्हटल्यास मोठ्या प्रमाणात व्याज द्यावे लागते त्यामुळे केवळ व्यवसाय कर्ज न मिळाल्यामुळे हे तरुण आपला व्यवसाय सुरु करू शकत नाहीत. आजच्या ह्या लेखामध्ये आपण सुशिक्षित बेरोजगार युवकांना कोणत्या योजनेचा लाभ घेतल्यास त्यांना फायदा होईल या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घ्या:
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना हि योजना एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविली जाणार आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी या योजनेचा लाभ घेतल्यास व्यवसाय करण्यास प्रकल्पासाठी जे कर्ज काढावे लागणार आहे त्या प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के अनुदान या योजना मधून तरुणास मिळेल शिवाय शासकीय अनुदान मिळत असल्यामुळे व्यावसायिक कर्ज भरण्यास सोपे जाईल.

एक जिल्हा एक उत्पादन योजना:
एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर हि प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना योजना राबविली जाणार आहे. या योजनेद्वारे सुशिक्षित बेरोजगार युवक त्यांच्या व्यवसाय उभारू शकतात. यासाठी बँकेतून कर्ज काढता येते आणि या कर्जावर ३५ टक्के अनुदान किंवा जास्तीत जास्त १० लाख रुपये अनुदान मिळते त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी हि योजना फायदाची ठरू शकते. या योजनेसाठी २७ कोटी ५७ लाख ७८ हजार निधीस प्रशासकीय मान्यता मिळाल्यासंदर्भातील नवीन जी.आर. नुकताच म्हणजे १५ जून २०२१ ला आला आहे. हा जी.आर व या योजनेसंदर्भातील इतर महत्वाची माहिती मिळवायची असेल तर जी.आर. व योजनेची अधिक माहिती मिळवू शकता.

उद्योग उभारणीसाठी प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के किंवा जास्तीत जास्त १० लाख रुपये अनुदान मिळणार:
ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त ज्या पिकांचे उत्पादन घेतले जाते त्या संदर्भातील उद्योग उभारण्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के किंवा जास्तीत जास्त १० लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. उदाहरणार्थ तुमच्या जिल्ह्यामध्ये तूर किंवा हरभरा या पिकाचे जास्त उत्पादन होत असेल तर दालमिल उद्योग उभारण्यास मदत मिळू शकते. तुमच्या जिल्ह्यामध्ये फळबाग जास्त असेल तर फळबाग प्रक्रिया उद्योग उभारण्यास मदत मिळू शकते उदाहरणच बघायचे झाल्यास जालना जिल्ह्यामध्ये मोसंबी फळबागा जास्त आहेत त्यामुळे जालना जिल्ह्यासाठी मोसंबी हे उत्पादन निवडण्यात आले आहे.

ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घ्या:
आता तुमच्या मनांत प्रश्न निर्माण झाला असेल कि या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करावा तर तो प्रश्न साहजिकच आहे. MOFPI या वेबसाईटवर जाऊन शेतकऱ्यांना किंवा इतर ज्या कुणाला व्यवसाय करण्यासाठी कर्ज काढत असाल आणि त्यावर अनुदान हवे असेल अशा तरुणांनी रजिस्ट्रेशन करून लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवावा. रजिस्ट्रेशन करण्यासाठी पुढे लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन करू शकता. MOFPI या वेबसाईटवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा.

व्यवसाय कर्ज योजना संदर्भात ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जाणून घ्या:
MOFPI या वेबसाईटवर नोंदणी करा.
नोंदणी लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवा
योजना व प्रकल्पासंदर्भातील माहिती वाचून घ्या.
ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाईन करतांना तुमच्या तालुक्यातील आत्मा अधिकारी यांची देखील मदत घेऊ शकता.

एक जिल्हा एक उत्पादन योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यास जिल्हा पातळीवरून मदत मिळेल:
तुम्हाला हा ऑनलाईन अर्ज परिपूर्ण जरी सादर करता आला नाही तरी काळजी करू नका. ऑनलाईन अर्जामध्ये जेवढी शक्य होईल तेवढी माहिती भरा. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता जिल्हा पातळीवर एक किंवा अनेक तज्ञाची नियुक्ती केलेली असते आणि त्यांचे कामच असते कि ज्यांना हा अर्ज भरण्यास अडचण येईल त्यांना संपूर्ण मदत करणे/ एवढेच नव्हे तर या प्रकल्पासाठी प्रकल्प अहवाल तयार कसा करावा, उद्योग आधार कसे काढावे हि व इतर संपूर्ण मदत तुम्हाला त्यांच्याकडून केली जाईल कारण तसा जी.आर. शासनाचे यापूर्वीच काढला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Business load through Maharashtra govt and central govt news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x