13 August 2020 4:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
x

शिवसेनेशी युती झाली तरी मुख्यमंत्री फक्त भाजपाचाच असेल; बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly Election 2019, Amit Shah, Devendra Fadnavis

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर सखोल चर्चा करण्यात आली. विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि मित्रपक्षांशी युती होईलच पण मुख्यमंत्रीपदासाठी भाजपा आग्रही राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक दिल्ली येथे पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आशिष शेलार, विनोद तावडे, सुधीर मुनगुंटीवार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते हजर होते. या बैठकीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात भाजपा ज्या जागांवर लढतंय तिथे आणि मित्रपक्षांच्या जागेवरही जिंकण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी, लोकसभा निवडणुकीत ज्याप्रकारे लोकांनी भाजपावर, महायुतीवर, नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखविला तसाच विश्वास विधानसभा निवडणुकीत दाखवतील असा विश्वास आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचा रोडमॅप तयार आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Amit Shah(239)#Devendra Fadnavis(465)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x